Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षीच दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाच्या प्री वेडिगं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १ मार्चपासून सुरु झालेल्या या आज शेवटचा दिवस आहे. जगभरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तसेच हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाने आपल्या गाण्यांनी अनेकांना नाचण्यास भाग पाडले. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बॉलीवूडचे सेलिब्रिटी थिरकताना दिसले. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
aditi rao hydari siddharth got married confirmed by host sachin kumbhar during heeramandi show
अदिती राव हैदरीच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाने केलेलं विधान चर्चेत
pimpri chinchwad, Maval Lok Sabha ransangram, program, Debates, Discussions, candidate, political party members, srirang barane, sanjog waghere, bjp, shivsena, congress, elections 2024, maharashtra politics, marathi news,
पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरमध्ये जय्यद तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळाला फुलांनी सजवण्यात आले आहे. तर भिंतीवर सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी महागडे झुबंरही लावण्यात आले आहेत. या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा- Video: गोंडस राहा कपूर जेव्हा अनंत अंबानींना भेटते, प्री-वेडिंग सोहळ्यातील आलियाचा लेकीसह व्हिडीओ व्हायरल

दरम्यान अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. ‘मेन्स एक्सपी’च्या रिपोर्टनुसार तीन दिवासाच्या या शाहीकार्यक्रमासाठी अंबानी यांनी जवळपास १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना जेवणात २५०० प्रकारचे पदार्थ चाखायला मिळत आहेत. यासाठी इंदौरवरुन ६५ आचार्यांना बोलवण्यात आले आहे.