Anant-Radhika Reception: देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला लग्नबंधनात अडकला. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात, देश-विदेशातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत अनंत-राधिकाचं लग्न पार पडला. या शाही लग्नसोहळ्यानंतर काल, १३ जुलैला 'शुभ आशीर्वाद' सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक दिग्गज मंडळी अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यानंतर आज अनंत-राधिकाचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.