साखरपुडा झाल्यानंतर अनंत अंबानी-राधिका मर्चंटसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, व्हिडीओ व्हायरल |anant ambani radhika merchant at tirupati balaji mandir photo viral | Loksatta

साखरपुडा झाल्यानंतर अनंत अंबानी-राधिका मर्चंटसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, व्हिडीओ व्हायरल

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन

radhika merchant anant ambani photo
राधिका मर्चंट-अनंत अंबानी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटशी काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. राधिका व अनंत अंबानीच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

साखरपुड्यानंतर आठ दिवसांनी अनंत अंबानी व राधिका मर्चंट तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तिरुमाला मंदिरात दर्शन घेत त्यांनी पारंपरिक पूजाही केली. राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांचे तिरुपती बालाजीच्या मंदिरातील दर्शनाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा>> Video: हातात दारुचा ग्लास अन् कंगना रणौतचा डान्स; पार्टीतील व्हिडीओमुळे अभिनेत्री ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिंदू धर्म…”

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांनी २४ जानेवारी(मंगळवारी) ओडिसा राज्यातील जग्गनाथ मंदिराला भेट दिली. त्याआधी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शनही त्यांनी घेतले असल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> आधी साखरपुडा अन् लगेचच दुसऱ्या दिवशी पार पडलं लग्न; ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याची नवी इनिंग

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा साखरपुडा १९ जानेवारीला पार पडला होता. अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या साखरपुड्यात अनंत अंबानी व राधिकासाठी खास डान्सही केला होता. अनंत अंबानी व राधिका मर्चंट गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 18:59 IST
Next Story
‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, चाहत्यांना सक्सेस मंत्र देत म्हणाला…