उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा पार पडला. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अ‍ॅन्टेलिया या अंबानींच्या मुंबईतील निवासस्थानी राधिका व अनंत अंबानीच्या साखरपुड्याचा शाही सोहळा पाहायला मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात अंबानी कुटुंबियांच्या डान्सची झलकही पाहायला मिळाली. अंबानी कुटुंबियांकडून राधिक व अनंतला खास डान्स सरप्राइज मिळालं. ‘वाह वाह रामजी’ या गाण्यावर अंबानी कुटुंबियांनी ठेका धरला. लाडक्या लेकाच्या साखरपुडा समारंभात मुकेश अंबानी व नीता अंबानीही थिरकलेले पाहायला मिळाले. त्यांच्याबरोबर आकाश अंबानी व सून श्लोका मेहता, मुलगी ईशा अंबानी व तिच्या पतीनेही ठेका धरलेला पाहायला मिळाला.

हेही वाचा>>अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यातील ‘त्या’ कृतीमुळे आर्यन खान ट्रोल, नेटकरी म्हणतात “नशेत…”

हेही वाचा>> “जगातील सगळ्यात…”, पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर राखी सावंतची पहिली पोस्ट

अंबानी कुटुंबियांचा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यातील हा डान्स व्हिडीओ वरिंदर चावला या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अंबानी कुटुंबियांच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राधिका व अनंत यांच्या साखरपुडा सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्याच महिन्यात त्यांचा रोका पार पडला होता. आता साखरपुडा सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राधिका व अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant engagement ceremony mukesh ambani neeta ambani dance on wah wah ramji video kak
First published on: 20-01-2023 at 14:14 IST