अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्चदरम्यान धूमधडाक्यात पार पडला. या भव्य सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना आमंत्रित केले होते. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. आता हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंबानी आणि मर्चंट कुटुंबाचा हा सोहळा कुठे आयोजित केला आहे हे जाणून घेऊया.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा जुलैमध्ये मुंबईत एका भव्य ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. वराची आई म्हणजेच नीता अंबानी या लग्नाची सर्व तयारी पाहत आहेत.

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

याआधी या प्रीवेडिंग सोहळ्यादरम्यान, अनंत अंबानीने आपल्या आईचे मनापासून आभार व्यक्त केले होते. सर्व मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना एक संस्मरणीय अनुभव मिळावा याची सर्व जबाबदारी प्री-वेडिंग सोहळ्यात नीता अंबानी यांनी घेतली होती, म्हणून या सगळ्याचे श्रेय अनंत अंबानीने त्याच्या आईला दिले होते.

या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींना आमंत्रणं देण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वी प्री-वेडिंग सोहळ्याची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही व्हायरल झालेली पत्रिका नऊ पानांची असून नऊ ड्रेसकोड या पत्रिकेत दिले गेले होते. अशाच प्रकारे लग्नाची पत्रिकादेखील असेल, याची शक्यता टाळता येणार नाही.

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अर्पिता खान पोहोचली निजामुद्दीन दर्ग्यात; व्हिडीओ व्हायरल

माहितीनुसार, प्री-वेडिंग सोहळ्यात नेचर थीम, भारतीय पारंपरिक थीम आणि ॲनिमल प्रिंट थीम अशा बऱ्याच थीम्स होत्या. तरी लग्नसोहळ्यातील ड्रेस कोड आणि थीमबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विराट-अनुष्का, रणबीर-आलिया आणि विकी-कतरिना हे कलाकार जुलैमध्ये पार पडणाऱ्या लग्नासोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा… चेतन वडनेरेने सांगितलेला पत्नी ऋजुताच्या नावाचा ‘तो’ भन्नाट किस्सा; अभिनेता म्हणाला होता, “मी मुद्दाम तिच्या नावाची मस्करी…”

दरम्यान, गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता, तर १ ते ३ मार्चदरम्यान गुजरात जामनगर येथे या कपलचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे.