अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. १ मार्च ते ३ मार्चदरम्यान अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा भव्य स्वरूपात पार पडला. गुजरात येथील जामनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, जगप्रसिद्ध गायिका रिहानापासून ते बॉलीवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेकजण या सोहळ्याला उपस्थित होते. तसंच या महिन्याच्या सुरूवातीला अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली येथे पार पडला. २९ मे ते १ जून रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात अंबानी, मर्चंट कुटुंबासह सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. हेही वाचा. VIDEO: बॉडीगार्डने ढकलल्यानंतर नागार्जुन यांनी घेतली त्याच दिव्यांग चाहत्याची भेट, म्हणाले, “ही तुमची चूक…” आता या प्री-वेडिंगनंतर १२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. या कपलची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. याचा व्हिडीओ 'विरल भयानी' या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सुरू होताच यामध्ये एक चांदीचं मंदिर पाहायला मिळतंय. या मंदिरात हिंदू देवांच्या काही सोनेरी मूर्तीदेखील पाहायला मिळतायत. मूख्य पत्रिका उघडताच पत्रिकेत अनेक देवांचे फोटो आणि फ्रेम्स पाहायला मिळतायत. श्री गणेश, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, राधा-कृष्ण, देवी दुर्गा अशा देव-देवतांचे फोटो आणि फ्रेम्स या पत्रिकेत पाहायला मिळतायत. या पत्रिकेत लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी एक वेगळं कार्ड असल्याचं दिसतंय. त्यानंतर एका वेगळ्या बॉक्समध्ये देवांच्या काही सोनेरी मुर्तीदेखील पाहायला मिळतायत. बॉक्स उघडताच त्यातल्या एका डिझायनर कपड्यावर 'अ' आणि 'र' म्हणजेच अनंत आणि राधिका यांची अक्षरं लिहिलेली दिसतायत. हेही वाचा. अभिनेत्री सई लोकूरने पहिल्यांदाच शेअर केला लेक ताशीबरोबरचा फोटो, म्हणाली, “ती एकदाही रडली…” अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी यावर भरभरून कमेंट्स करत आपला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा झाला होता, तर दोनवेळा या कपलचा प्री-वेडिंग सोहळा पार पडला. आता अनंत आणि राधिकाचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा १२ जुलै रोजी मुंबईत एका भव्य ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. वराची आई म्हणजेच नीता अंबानी या लग्नाची सर्व तयारी पाहत आहेत.