मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटशी १२ जुलै रोजी लग्न करणार आहे. त्यांचे लग्न मुंबईत होईल. त्यांच्या लग्नातील समारंभांना सुरुवात झाली आहे. दोन प्री-वेडिंगनंतर आता लग्नाआधीच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दोघांच्या लग्नातील कोणते कार्यक्रम, कधी असतील याचे शेड्यूल आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत-राधिकाच्या लग्नातील कोणते समारंभ कधी असतील?

अनंत -राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. ३ जुलैपासून समारंभ सुरू झाले असून ते १४ जुलैपर्यंत चालतील. मामेरू समारंभ आणि गरबा नाईटनंतर संगीत ५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे होणार आहे. त्यात सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबत जस्टिन बीबर आणि बादशाह देखील याठिकाणी परफॉर्म करणार आहेत.

सलमान खान आणि रणवीर सिंग देखील या म्युझिक नाईटचा भाग असतील. जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरीही संगीत नाईटमध्ये धमाल करताना दिसणार आहे.

‘बेबी बंप खोटा आहे’ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिला पुरावा, खरमरीत प्रश्न विचारत म्हणाली…

पूजा

८ जुलै रोजी गृह पूजा होणार आहे. यामध्ये फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होतील. १० जुलै रोजी ‘शिव’ पूजा होईल, जी अनंत आणि राधिकासाठी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर रात्री यंगस्टर्स नाईट होणार आहे, ज्यामध्ये अनेक लोक सहभागी होतील. खासकरून अनंत व राधिकाचे मित्र-मैत्रिणी असतील.

फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

रिसेप्शन कधी होईल?

अनंत व राधिकाचे लग्न १२ जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाचा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजता आहे. लग्नाचे फेरे अँटिलिया येथे होणार आहेत. यानंतर १३ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद समारंभ होईल. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर इथे सहा वाजार हा समारंभ होईल. आशीर्वाद समारंभ हे एकप्रकारचे मिनी रिसेप्शन असेल आणि यात मोजकेच लोक सहभागी होतील. यानंतर १४ जुलै रोजी शेवटचे रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात येईल.

‘टिप टिप बरसा पानी’मध्ये अक्षय कुमारला किस करायला तयार नव्हती रवीना टंडन; कारण ऐकून दिग्दर्शक म्हणाले, “तुझ्या बाबांना…”

अनंत व राधिकाच्या लग्नातील प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगळा मेनू ठेवण्यात आला आहे. हे लग्न खूप भव्य होणार आहे आणि सगळीकडे याच लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात जामनगरमध्ये झालेल्या जंगी प्री-वेडिंग सोहळ्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्यात आली होती. या लग्नाआधी जून महिन्यात इटलीमध्ये क्रूझवर प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या पार्टीत अंबानी व मर्चंट कुटुंबाचे जवळचे लोक, फिल्म इंडस्ट्रीतील लोक, काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant wedding program schedule pooja sangeet night reception details hrc
Show comments