मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; ‘त्या’ चॅटसंबंधी विचारल्यानंतर अनन्या NCBला म्हणाली, “मी तर मस्करी…”

एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत.

Ananya Panday, ananya panday, aryan khan, ncb, ncb sources, ganja, ananya panday ganja,

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. अनन्याची काल साधारण तीन तास चौकशी सुरू होती. आजही तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या चौकशीमध्ये अनन्याला चॅटमधील आर्यन खानसाठी गांजाची व्यवस्था करण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीला अनन्या आणि आर्यन खानच्या मोबाईलमधील काही चॅट सापडले आहेत. या चॅटमध्ये त्यांनी गांजा खरेदीबाबत चर्चा केल्याचे समोर आले. एनसीबीच्या सूत्रांनी इंडिया टूडेला या संदर्भात माहिती दिली आहे. आर्यन आणि अनन्या चॅटमध्ये गांजाविषयी बोलत होते. त्यावेळी आर्यन तिला गांजाची व्यवस्था करण्यास सांगत होता. त्यावर अनन्याने मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते असे म्हटले होते. आज एनसीबीने अनन्याला याबाबत प्रश्न विचारल्यावर तिने ‘मी तर मस्करी करत होते’ असे उत्तर दिले आहे.
आखणी वाचा :…अन् शाहरुखने जोडले हात; मुलगा आर्यन खानच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला आहे. गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ananya panday agreed to arrange ganja for aryan when asked by ncb said was joking avb

Next Story
मन्नतवर पोहोचलेल्या NCB अधिकाऱ्यांना शाहरुख म्हणाला, “तुम्ही चांगलं काम करताय, पण आर्यनला…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी