‘फोर्ब्स ३० अंडर ३०’ची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत ३० वर्षांखालील स्टार्सच्या नावांचा समावेश आहे, जे आपापल्या क्षेत्रात अप्रतिम काम करीत आहेत. यंदा त्यामध्ये चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील या अभिनेत्रीने स्थान मिळवले आहे. ही अभिनेत्री जान्हवी कपूर किंवा सारा अली खान नव्हे, तर बॉलीवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने बाजी मारली आहे.
अनन्या पांडेने अलीकडेच ‘केसरी २’ या चित्रपटात तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहत्यांनी तिच्या भूमिकेचे खूप कौतुक केले आहे. आता अनन्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येत आहे. अनन्याने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे आणि यावेळी तिच्याबरोबर ईशान खट्टरदेखील चर्चेत आहे.
‘फोर्ब्स ३० अंडर ३०’ मध्ये अनन्याची एन्ट्री
अनन्या पांडेने ‘फोर्ब्स’च्या लोकप्रिय ३० अंडर ३० आशिया यादी २०२५ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हो, फोर्ब्समध्ये; जे एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय क्षेत्रावर आधारलेले मासिक आहे. दरवर्षी या यादीत ३० वर्षांखालील तरुणांचा समावेश केला जातो, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपापली प्रतिभा सिद्ध केली आहे. यावेळी, अनन्याने तिच्या उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर या यादीत स्थान मिळवून ती कोणापेक्षाही कमी नाही हे सिद्ध केले आहे. तिच्या या कामगिरीने तिचे चाहते खूप उत्साहित आहेत आणि सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत आहेत.
अनन्याबरोबरच ईशान खट्टरनेही फोर्ब्सच्या ३० अंडर ३० आशिया लिस्ट २०२५ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. अलीकडेच ईशानच्या ‘द रॉयल्स’ या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. हिंदी चित्रपटांपासून ते इंग्रजी वेब सीरिजपर्यंत ईशानने आपले आकर्षण दाखवून सर्वांना प्रभावित केले आहे. तो लाइमलाइटपासून दूर असला तरी त्याच्या प्रतिभेची जादू अजूनही अबाधित असल्याचे या कामगिरीवरून सिद्ध होते. त्याशिवाय गायक अनुव जैन यांचे नावही या यादीत समाविष्ट आहे, ज्यांनी आपल्या जादुई आवाजाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
ईशान खट्टरच्या व्यावसायिक कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तो अलीकडेच ‘द रॉयल्स’ या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. या सीरिजमध्ये त्याच्याबरोबर भूमी पेडणेकरही दिसत आहे. त्याशिवाय ईशान आणि जान्हवी कपूरचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला आहे. अनन्या पांडेबद्दल बोलायचे झाले, तर ती अलीकडेच अक्षय कुमारबरोबर ‘केसरी चॅप्टर २’मध्ये दिसली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
अलीकडेच बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे आणि त्यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने एका स्टेजवर एकत्रितपणे धमाकेदार डान्स सादर केला. या परफॉर्मन्समध्ये त्यांनी ९० च्या दशकातील लोकप्रिय गाणे ‘मेरा दिल तोता बन जाये’वर थिरकून प्रेक्षकांची मने जिंकली. डान्स करताना चंकी पांडेने आपल्या जुन्या हिट गाण्याला नव्या जोमात सादर केलं आणि अनन्या पांडेनेही आपल्या उत्साही नृत्याने स्टेजवर रंगत आणली.