Entertainment Breaking News Today 4 June 2025: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचे त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या स्वभावाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. आता चंकी पांडेंची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडेनेदेखील शाहरुखचे एका मुलाखतीत कौतुक केले आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान व अनन्या दोघी बालमैत्रीणी आहेत.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अनन्या म्हणाली, “शाहरुख खान हे अबराम, सुहाना व आर्यनचे उत्तम वडील आहे. मी मोठी होत असताना हे मी स्वत: पाहिले आहे. आमच्या खेळाच्या आणि तायक्वांदो स्पर्धांसाठी ते आमची तयारी करून घेत असत. आमच्या आयुष्यात काहीही घडत असलं तरी ते कायम आमच्याबरोबर होते. आजही ते आमच्या आयुष्यात, करिअरमध्ये काय चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. ज्या पद्धतीने ते त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्याचा समतोल साधतात, तसे इतर कोणी करू शकत नाही. त्यांच्यासारखे इतर कोणी असू शकत नाही”, असे म्हणत अनन्या पांडेने शाहरुखचे कौतुक केले आहे.

याबरोबरच,मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Manoranjan Breaking News Updates: मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...

20:06 (IST) 4 Jun 2025

IPL संघाची मालकीण ते ३४ मुलींचं पालकत्व…; प्रीती झिंटाने ३४ व्या वर्षी घेतलेला मोठा निर्णय, जाणून घ्या…

प्रिती झिंटा आहे ३४ मुीलींची दत्तक आई, अभिनेत्रीने अनेक वर्षांंपूर्वी घेतला होता मोठा निर्णय ...अधिक वाचा
18:30 (IST) 4 Jun 2025

Video: सुहासचे सत्य सर्वांसमोर येणार अन् शिवा…; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, "एकच नंबर शिवा…"

Shiva Upcoming Promo: सुहासचे सत्य समोर आल्यानंतर शिवा करणार 'ती' गोष्ट; पाहा प्रोमो ...सविस्तर बातमी
17:51 (IST) 4 Jun 2025

दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, पती शोएब इब्राहिम उपचारांविषयी माहिती देत म्हणाला, "१४ तास…"

"ती १४ तास...", दीपिका कक्करच्या नवऱ्याने दिली माहिती, अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया झाल्याचं सांगत म्हणाला... ...सविस्तर वाचा
17:10 (IST) 4 Jun 2025

'मिस्टर इंडिया' चित्रपटातील मोगॅम्बोचा आउटफिट होता खूप महाग; बोनी कपूर यांनी खर्च केले होते 'इतके' पैसे

'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला. ...वाचा सविस्तर
17:04 (IST) 4 Jun 2025

अमिताभ बच्चन यांचे केस कापताना आलिम हाकीमच्या वडिलांचा झाला होता मृत्यू; म्हणाला, "छातीत दुखायला लागलं अन्…"

सेलिब्रिटी हेअरड्रेसर आलिम हाकीमच्या वडिलांचा अमिताभ बच्चन यांचे केस कापताना झाला होता मृत्यू ...सविस्तर वाचा
16:55 (IST) 4 Jun 2025

'मेट्रो इन दिनों'चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या...

अनुराग बसु दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनों'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अली फजल, फातिमा सना शेख, अनुपम खेर असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Wm2R3aJPY2M&

16:31 (IST) 4 Jun 2025

"तो काळ खरंच खूप कठीण…", अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली, "चार वर्षांची असताना माझ्या पालकांचा घटस्फोट …"

Dia Mirza Recalls Hard Terrifying Years: "अनेक वर्षे मी माझ्या हेअरड्रेसरबरोबर...", दिया मिर्झा काय म्हणाली? ...सविस्तर वाचा
16:24 (IST) 4 Jun 2025

सुनील शेट्टीने विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडीओ केला शेअर; म्हणाला, "ही एक अशी प्रेमकहाणी…"

१८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर सुनील शेट्टीही भावुक झाला आहे. ...अधिक वाचा
15:51 (IST) 4 Jun 2025

"माणूस आणि कलाकार म्हणून…", अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित सहकलाकाराची खास पोस्ट, म्हणाला, "कामावर निष्ठा…"

अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्याची खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला, "माणूस आणि कलाकार म्हणून..." ...सविस्तर वाचा
15:39 (IST) 4 Jun 2025

'पंचायत सीझन ४'ची प्रतीक्षा संपली, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

‘पंचायत’ या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केलं आहे. ...सविस्तर बातमी
14:32 (IST) 4 Jun 2025

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलांनी पहिल्यांदाच केला बिझनेस क्लासमधून विमान प्रवास; पालक म्हणून केला होता 'हा' नियम

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलांचा पहिल्यांदाच विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास, अभिनेत्रीने केला होता 'हा' नियम ...सविस्तर वाचा
14:30 (IST) 4 Jun 2025

"'त्या' माणसांवर कायमची फुल्ली मारतो…", शरद पोंक्षे यांचं वक्तव्य; 'तो' अनुभव सांगत म्हणाले…

शरद पोंक्षे यांचं वक्तव्य, "'त्या' माणसांवर कायमची फुल्ली मारतो...", म्हणाले... ...अधिक वाचा
14:19 (IST) 4 Jun 2025

बॉलिवूड सेलिब्रिटींचे केस कापण्यासाठी आलिम हाकिम घेतो लाखो रुपये; म्हणाला, "प्रत्येक सेशनसाठी…"

Aalim Hakim on How Much Charged From Bollywood Celebrity: आलिम हाकिमच्या सलूनमध्ये सर्व सामान्यांकडून घेतली जाते 'इतकी' फी; खुलासा करत म्हणाला... ...अधिक वाचा
13:21 (IST) 4 Jun 2025

"तुम्ही सर्वजण…", संतापलेल्या जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना झापलं; व्हिडीओ व्हायरल

संतापलेल्या जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींना झापलं; म्हणाल्या, "या गाडीत बसा..." ...सविस्तर बातमी
12:47 (IST) 4 Jun 2025

शाहरुख खान, जुही चावलाच्या गाजलेल्या चित्रपटात सोनाली बेंद्रेला मिळालेली दुय्यम भूमिका, अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी, म्हणाली…

शाहरुख खानच्या 'त्या' चित्रपटात मिळालेल्या दुय्यम भूमिकेबद्दल सोनाली बेंद्रेचं वक्तव्य; म्हणाली... ...वाचा सविस्तर
12:37 (IST) 4 Jun 2025

५१ वर्षीय मलायका अरोराच्या फिट राहण्याचे 'हे' आहे सिक्रेट; खुलासा करत म्हणाली, "मी खाण्यापूर्वी…"

Malaika Arora Shares Her Fitness Secret: "मी जेवणात भात...", मलायका अरोरा डायटिंगबद्दल काय म्हणाली? जाणून घ्या... ...अधिक वाचा
12:34 (IST) 4 Jun 2025

आमिर खानच्या 'पीके'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' लोकप्रिय अभिनेत्याच्या नावाचीही चर्चा

आमिर खान आणि राजकुमार हिरानी जोडी पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार, 'पीके'चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ...सविस्तर बातमी
12:24 (IST) 4 Jun 2025

"मी सहमत नाही…", प्रसिद्ध अभिनेत्रीची परेश रावल यांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…

"इंडस्ट्रीत मित्र नसतात सहकारी असतात" परेश रावल यांच्या वक्तव्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली... ...अधिक वाचा
12:00 (IST) 4 Jun 2025

प्रिन्स नरुला नंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी झाली चोरी; पोस्ट शेअर करत म्हणाला, "माझ्या मुली…"

'या' अभिनेत्याच्या घरी झाली चोरी; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला... ...वाचा सविस्तर
11:20 (IST) 4 Jun 2025

'हिरामंडी' फेम प्रसिद्ध अभिनेता गेले सहा महिने कामाच्या शोधात, म्हणाला, "इंडस्ट्रीतील लोक…"

सहा महीने काम नाही, स्वत:च घर नाही अन्...; प्रसिद्ध अभिनेता घराणेशाहीचा बळी, म्हणाला... ...सविस्तर वाचा
11:20 (IST) 4 Jun 2025

"विराटने आजवर क्रिकेटला…" RCBच्या विजयानंतर विकी कौशल, रणवीर सिंहची कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाले…

RCBच्या विजयानंतर विकी कौशल, रणवीर सिंहची कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाले... ...सविस्तर बातमी
10:57 (IST) 4 Jun 2025

ना ऐश्वर्या ना कतरिना, 'या' अभिनेत्रीबद्दल सलमान खान म्हणालेला, "मी तिच्याशी लग्न करेन…"

अनेक दिग्गज कलाकारांनी सलमानबद्दल काही रंजक किस्से सांगितले आहेत. ...सविस्तर बातमी
10:51 (IST) 4 Jun 2025

विभू राघवचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल; 'अशी' झालेली अभिनेत्याची अवस्था, म्हणालेला…

विभू राघव हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होता. ...सविस्तर वाचा
10:22 (IST) 4 Jun 2025

Video : जमिनीवर लोळला, अंगावर पाणी ओतून घेतलं…; RCB च्या विजयानंतर अल्लू अर्जुनच्या ११ वर्षांच्या मुलाला अश्रू अनावर, म्हणाला…

RCB च्या विजयानंतर अल्लू अर्जुनच्या मुलाला अश्रू अनावर! ११ वर्षांचा अयान जमिनीवर लोळण घालून रडला...; पाहा व्हिडीओ ...वाचा सविस्तर
10:04 (IST) 4 Jun 2025
देवमाणसाच्या मुखवट्याआड सुरू होणार नवा खेळ; पाहा प्रोमो

'देवमाणूस' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. देवीसिंग उर्फ अजितकुमारने गोपाळचे रुप घेतल्याचे पाहायला मिळाले. आता तो कुरोली गावात गोपाळ बनून आला असून गावकऱ्यांसाठी देवमाणूस होण्याची संधी त्याच्यासमोर आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता नेमके पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

https://www.instagram.com/reel/DKclFNmNK9E/?utm_source=ig_web_copy_link

Shah Rukh Khan

शाहरुख खान (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या...