बॉलीवूड स्टार्स सध्या त्यांच्या चित्रपटांबद्दल ‘बॉयकॉट‌ बॉलिवूड’ ट्रेंडमुळे गेले काही दिवस खूप चिंतेत आहेत. आतापर्यंत बरेच बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले आहेत. अगदी आमिर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला नाही. चित्रपटांच्या अयशस्वी कामगिरीमुळे अनेक कलाकारांचे करिअर पणाला लागले आहे आणि त्यातील एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : कास्टिंग काऊचचा अनुभव सांगत ‘या’ अभिनेत्रीने जाहीर केला मोठा निर्णय, म्हणाली…

अनन्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु तिने काम केलेला एकही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तिचा ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर आता अनन्यावर वाईट दिवस असल्याचे दिसत आहे.

बॉलीवूड स्टार अनन्या पांडेने तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या पॅन इंडिया चित्रपट ‘लायगर’मध्ये प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे प्रमोशन बघता या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाची गाणी, ट्रेलर आणि टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण त्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये चालला नाही. परिणामी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमी रकमेची कमाई केली.

कोणताही दक्षिणात्य चित्रपट साइन करण्यापूर्वी अनन्याला लायगरचे यश पाहायचे होते. जेणेकरून ती तिच्या पुढच्या चित्रपटासाठी मोठ्या रकमेची मागणी करू शकेल. ‘लायगर’ रिलीज होण्याची वाट बघत अनन्याने कोणताही चित्रपट साइन केला नाही. ‘लाइगर’ हिट होताच अनन्या तिच्या मानधनात वाढ करून ते 4 कोटी करणार होती, असे म्हटले जात आहे. मात्र, असे काहीही झाले नाही आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला.

हेही वाचा : ‘लायगर’मुळे विजय देवरकोंडाला मोठा फटका, ‘या’ चित्रपटाचं शूटिंग झालं कायमस्वरूपी बंद

‘लायगर’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अनन्याला तिच्या मानधनात कोणताही बदल करता आला नाही. आगामी चित्रपटांसाठी ती दीड ते दोन कोटी रुपये आकारण्याचा विचार करत आहे. पण आता अनन्याला कोणत्याही दक्षिणात्य चित्रपटाच्या ऑफर्स मिळत नाहीयेत. एका वृत्तानुसार, चित्रपट निर्मात्यांना अनन्याच्या अभिनयाची भुरळ पडली नाही. त्यामुळेच तिला आतापर्यंत नवीन कोणत्याही दक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आलेली नाही. इतकेच नव्हे तर यापूर्वी तिला विचारण्यात आलेल्या दक्षिणात्य चित्रपटांसाठी आता इतर अभिनेत्रींचा निर्माते विचार करत आहेत. त्यामुळे आगामी काळ अनन्यासाठी आव्हानात्मक असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya pandey isnt getting offers from south indian film industry rnv
First published on: 22-09-2022 at 14:21 IST