scorecardresearch

… आणि साराला ‘त्याच्या’सोबत फोटोही मिळाले

जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला केली होती चाहत्यांनी गर्दी

सारा तेंडूलकर आणि तिची मैत्रीण जस्टिन बिबरसोबत
जस्टिन बिबर या आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध पॉप गायकाला ऐकण्याची आणि पाहण्याची उत्सुकता मुंबईकरांमध्ये शिगेला पोहोचली होती. त्याच्या चाहत्यांमध्ये सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराही यामध्ये मागे नव्हती. तिने या कार्यक्रमाला केवळ उपस्थितीच लावली नाही तर जस्टिन बिबरसोबत चक्क फोटो काढण्याचा आनंदही घेतला.

आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर या कॉन्सर्टला उपस्थित राहिलेल्या साराने जस्टिनबरोबरचे आपले फोटो सोशल मिडियावर अपलोडही केले आहेत. जस्टिन बिबर सध्या वर्ल्ड टूरवर असून नुकताच त्याचा मुंबईत शो झाला. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये त्याच्या कॉन्सर्टसाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांमध्ये आलिया भट्ट, अयान मुखर्जी, मलायका अरोरा, अरबाज खान, अर्जुन रामपाल, श्रीदेवी, बोनी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर याठिकाणची गर्दी पाहून बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर गर्दी पाहून निघून गेले.

अर्जुन जैन या २७ वर्षांच्या उद्योजकाने पर्पज वर्ल्ड टूरच्या अंतर्गत या कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कॉन्सर्टचे तिकिटही ४ हजार ते ७० हजार इतके ठेवण्यात आले होते. मात्र कोणत्याही गोष्टीची आवड असली की त्यापुढे तिकिटाची किंमत पाहिली जात नाही, हेच याठिकाणी उपस्थित असलेल्यांनी दाखवून दिले. मागील अनेक दिवसांपासून जस्टिन मुंबईत येणार असल्याची चर्चा होती आणि त्याच्या कॉन्सर्टच्या व्यवस्थेबाबतही अनेक गोष्टींबाबत भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आणि अखेर हा शो पार पडला. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान मागील १८ वर्षांपासून असलेला अंगरक्षक शेरा याने जस्टिनला विशेष सुरक्षा दिली होती. तर या कार्यक्रमस्थळी ५०० पोलिसांचा ताफा तैनात कणऱ्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: And sara tendulkar daughter of sachin tendulkar got photos with jastin biber

ताज्या बातम्या