scorecardresearch

अनिल कपूर होणार आजोबा, सोनम कपूरने दिली ‘गूड न्यूज’

सोनमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

sonam kapoor pregnant, anil kapoor,
सोनमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम लवकरच आई होणार आहे. सोनमने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गूड न्यूज दिली आहे. तिने दिलेल्या गूड न्यूजनंतर बॉलिवूड सेलिब्रिटीजने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सोनमने पती आनंद अहूजासोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केले. फोटोमध्ये सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आनंदच्या मांडीवर डोक ठेवून असल्याचे दिसत आहे. फोटोमध्ये सोनमचा बेबी बंपही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत सोनमने एक कवीता शेअर केली आहे. शेवटी तुझ्या येण्याची आता प्रतिक्षा करू शकत नाही असं सोनम म्हणाली. सोनम आणि आनंदचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : सर्वांसमोर नवऱ्यावर भडकली अंकिता लोखंडे; पाहा होळी पार्टीत असं काय घडलं…

आणखी वाचा : ‘I Hate Kashmir Flies…’, राम गोपाल वर्मांच्या कमेंटवर विक्रम अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सोनम आणि आनंदचे लग्न २०१८ मध्ये झाले. तेव्हापासून सोनमचे चाहते या गुड न्यूजची प्रतिक्षा करत होते. सोनम सध्या पतीसोबत लंडनमध्ये राहते. करिअर विषयी बोलायचे झाले तर, सोनम लवकरच अब शोम माखिजा दिग्दर्शित चित्रपट ‘ब्लाइंड’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात एका कार अपघातात एका महिलेने आपले डोळे गमावले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil kapoor going to be grandfather sonam kapoor kapoor is pregnant shares photo dcp

ताज्या बातम्या