scorecardresearch

अनिल कपूरने जर्मनीमध्ये केली उसेन बोल्टसोबत पार्टी, पाहा फोटो आणि व्हिडीओ

अनिल कपूर आणि उसेन बोल्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

अनिल कपूरने जर्मनीमध्ये केली उसेन बोल्टसोबत पार्टी, पाहा फोटो आणि व्हिडीओ
अनिल कपूर आणि उसेन बोल्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच अनिल कपूर यांनी काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अनिल कपूर हे सध्या जर्मनीमध्ये आहेत. तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अनिल यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये उसेन बोल्ट आणि मोहम्मद फराह दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘उसेन बोल्ट आणि मोहम्मद फराहसोबत एक लेजंडरी रात्री’, असे कॅप्शन अनिल कपूर यांनी दिले आहे. अनिल कपूर यांनी शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

तर उसेन बोल्टने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल एका पार्टीत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘मुनिचमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत पार्टी’, असे कॅप्शन उसेनने दिले आहे.

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

लवकरच अनिल कपूर हे नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी आणि युट्यूबची क्वीन प्राजक्ता कोळीसोबत ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर रणबीर कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसतील.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil kapoor party with usain bolt and others in germany dcp

ताज्या बातम्या