झक्कास! व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर यांनी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे केले स्वागत

अनिल कपूर यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

anil-kapoor-anil-kapoor-twitter
अनिल कपूर यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी आतुर होते. त्यात राज्यातील महाविकासआघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचे आदेश दिले. २२ ऑक्टोबर पासून राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू झाले आहेत. त्यात बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अनिल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनिल यांच्या बऱ्याच चित्रपटाचे डायलॉग आणि गाणी आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “चित्रपटगृहात तुमचे स्वागत”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

अनिल हे काही दिवसांपूर्वी त्यांची धाकटी लेक रियाच्या लग्नामुळे चर्चेत होते. अनिल ६४ वर्षांचे असून ही फिट अभिनेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान, गेल्या वर्षी अनिल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एके वर्सेस एके’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबत अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत दिसला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anil kapoor shares a video of his movies and dialogues and welcome everyone in theater dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या