बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते म्हणून अनिल कपूर ओळखले जातात. अनिल कपूर ६४ वर्षांचे असूनही फिट अभिनेते आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. एवढंच नाही तर ट्रोलर्सना ते मजेशीर उत्तर देखील देतात. यावेळी अनिल यांनी अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शो मध्ये हजेरी लावली आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी अनिल ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत.

‘पिंच २’ या टॉक शोमध्ये हजेरी लावणारा पाहुणा ट्रोलर्सला उत्तर देतो. त्याचप्रमाणे अनिल यांनी देखील ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. या प्रोमोमध्ये अनिल कूल लूकमध्ये दिसत आहेत. यावेळी ट्रोलर्सने त्यांच्या अभिनयावर, लेक सोनम कपूर आणि त्यांची पत्नी विषयी कमेंट केल्या आहेत. अनिल आणि सोनमला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, ‘वडील आणि मुलीची जोडी पैशासाठी काहीही करु शकते.’ यावर अनिल हसत म्हणाले, ‘त्यांनी जेव्हा ही कमेंट केली तेव्हा कदाचित ते दुःखी असतील किंवा त्यांचा दिवस वाईट गेला असेल.’

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

अनिल यांच्या एका पोस्टवर कमेंट करत दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना लाज वाटत नाही आणि ज्यांना लाज आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत.’ त्याला उत्तर देत अनिल म्हणाले, ‘जर तुम्हाला कोणाबद्दल माहिती नसेल, तर तुम्ही त्यावर तुमचे मत देऊ नका.’ तर अनिल यांनी पत्नी सुनीतासाठी केलेल्या एका पोस्टवर कमेंट करत त्यांनी धाकट लेक रिया कपूरने त्यांना ट्रोल केले. ‘बाबा, तुम्ही सगळ्या गोष्टीत थोडे जास्त आहात.’ यावर अनिल आणि अरबाज यांना हसू अनावर झाले.

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

दरम्यान, अरबाजच्या ‘पिंच’ या टॉकशोचा हा दुसरा सिझन आहे. या आधी प्रेक्षकांना ‘पिंच’चा पहिला सीझन प्रचंड आवडला होता. दरम्यान, ‘पिंच २’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खानने हजेरी लावली होती. त्यानंतर टायगर, किआरा आडवाणी, अनन्या पांडे सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.