भन्सालीच्या ‘बाजीराव मस्तानी’साठी अंजू मोदी करणार डिझायन

संजय लीला भन्सालीच्या राम लीला चित्रपटासाठी अंजू मोदी हिने कपडे डिझायन केले होते. आता अंजू पुन्हा एकदा भन्सालीसोबत काम करणार आहे.

संजय लीला भन्सालीच्या ‘राम लीला’ चित्रपटासाठी अंजू मोदी हिने कपडे डिझायन केले होते. आता अंजू पुन्हा एकदा भन्सालीसोबत काम करणार आहे.
अंजू मोदी ही भारतीय कपड्यांवरील डिझायनसाठी खासकरून ओळखली जाते. ‘राम लीला’ चित्रपटात दीपिकाने घातलेले रंगीबेरंगी घागरा चोली हे अंजूनेच डिझायन केले होते. “संजय लीला भन्साली हा एक असा चित्रपट दिग्दर्शक आहे ज्याचे डोळे नेहमी भारतीय कपडे आणि त्यावरील काम यांवर टिपलेलले असतात. अशाच डिझायनवर मी मुख्यत्वे काम करत असून त्याला माझे काम आवडले.  त्यामुळे माझी निवड करण्यामागचे हेच मुख्य कारण आहे. भन्सालीसोबत काम करण्यास मिळत असल्याने मी खूप आनंदी आहे,” असे अंजू म्हणाली. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ‘राम लीला’ मधील रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही जोडी पुन्हा पाहावयास मिळणार आहे. यात रणवीर १८व्या शतकातील मराठा बाजीराव पेशवे यांची भूमिका करणार असून दीपिका त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anju modi to design for bhansalis bajirao mastani

ताज्या बातम्या