काही दिवसांपूर्वी ‘बाबू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता चित्रीकरण बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून नुकताच या चित्रपटाचा ॲक्शन सिक्वेन्स चित्रित करण्यात आला. यात अभिनेता अंकित मोहनचे जबरदस्त ॲक्शन सीन्स आहे. त्यासाठी अंकितने बरीच मेहनत घेतल्याचे दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. या वेळी अंकितसोबत अभिनेत्री रूचिरा जाधवही उपस्थित होती. ‘बाबू’मध्ये अंकित, रूचिरासोबत नेहा महाजनही दिसणार आहे.

‘बाबू’च्या भूमिकेविषयी अंकित मोहन म्हणतो, ‘’बाबू ही व्यक्तिरेखा अंकितच्या खूप जवळची आहे. आमच्यात खूप साम्य आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. परंतु यातील ॲक्शन सीन्ससाठी मी मेहनत घेतली आहे. मी मार्शल आर्ट, कलरीपयट्टू शिकलो असल्याने मला त्याचा इथे खूप फायदा झाला. याआधीही मी ॲक्शन सीन्स केले आहेत. मात्र ऐतिहासिक आणि अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये खूप फरक आहे. ऐतिहासिक ॲक्शन सीन्स करताना तुमच्या हातात हत्यार असते तर अशा प्रकारच्या ॲक्शन सीन्समध्ये हातच तुमचे हत्यार असते. परंतु या दोन्ही सीन्समध्ये नियंत्रण आणि काळजी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे दोन्ही अनुभव मी घेतले आहेत. ‘बाबू’मधील ॲक्शन सीन्स मी खूप एन्जॅाय केले.’’

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित ‘बाबू’ या चित्रपटाचे निर्माता बाबू के. भोईर असून दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे हे आहेत. ॲक्शन सीन्सचा भरपूर तडका असलेला ‘बाबू’ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.