अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नात आले विघ्न; जाणून घ्या नेमकं काय झालं?

अंकिता लोखंडेचा विवाह सोहळा १२ ते १४ डिसेंबर दरम्यान आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्न करणार आहे. त्यासाठी संपूर्ण कुटुंबीय जोरदार तयारी करत आहेत. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरमध्ये त्यांच्या विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, अंकिताच्या लग्नात विघ्न आले आहे. अंकितासोबत असे काही झाले आहे की तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अंकिताच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला असून अंकिताला घरी आणण्यात आले आहे.’ अंकिताच्या पायाला दुखापत होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#BanLipstick नक्की काय आहे? तेजस्विनी पंडीतने सांगितले कारण, म्हणाली…

यापूर्वी अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मराठी पद्धतीने त्यांचे प्रीवेडिंग फंकशन झाले होते.

हेही वाचा : अंकिता लोखंडे राजभवनात, राज्यपालांना लग्नाचे खास आमंत्रण

अंकिता आणि विक्की जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकताच अंकिता आणि विकीचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अंकिता आणि विकी भर पार्टीत एकमेकांना किस करताना दिसून आले होते. विकी जैनआधी अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रिलेशलशीपमध्ये होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. आता अंकिता विकी जैनशी लग्न करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ankita lokhande admitted in hospital before marrriage with vicky jain avb

ताज्या बातम्या