scorecardresearch

अंकिता लोखंडे पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत! पूर्ण केली आईची अपुरी इच्छा

अंकिता लोखंडे सध्या ‘स्मार्ट जोडी’ या शोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ankita lokhande, vicky jain, smart jodi show, ankita lokhande wedding, ankita lokhande husband, ankita lokhande mother, अंकिता लोखंडे, विकी जैन, स्मार्ट जोडी शो, अंकिता लोखंडे लग्न, अंकिता लोखंडे पती
अंकिता लोखंडे डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये सहभागी झाली आहे. अंकिता लोखंडे डिसेंबर २०२१ मध्ये बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. पण आता ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये या दोघांनीही पुन्हा लग्न केलं आहे. यासोबतच अंकितानं तिच्या आईची अपुरी इच्छा देखील पूर्ण केली आहे.

अंकिता लोखंडे या आधीही अनेक रिअलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. पण विकी जैनशी लग्न केल्यानंतर अंकिताचा हा पहिलाच शो आहे. ‘स्मार्ट जोडी’ शोचा नवा प्रोमो नुकताच प्रसारित झाला आहे. ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा एकदा लग्न करताना दिसत आहेत. या लग्नामध्ये अंकिता लोखंडे मराठीमोळ्या पोशाखात दिसली. नॅशनल टेलिव्हिजनवर अंकिताच्या आईनं तिच्या अपुरी इच्छा व्यक्त केली होती. जी अंकितानं पूर्ण केली.

आणखी वाचा- Video- पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमानकडून झाली मोठी चूक, तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये अंकिताच्या आईनं अपुऱ्या राहिलेल्या इच्छेचा खुलासा केला. ती म्हणाली, ‘अंकिता आणि विकीनं शाही पद्धतीनं लग्न केलं. मात्र त्यावेळी एक इच्छा अपुरी राहिली होती. मराठमोळ्या पद्धतीनं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती.’ विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांनी मराठमोळ्या पद्धतीने ‘स्मार्ट जोडी’च्या मंचावर पुन्हा एकदा लग्न करत आईची इच्छा पूर्ण केली. एवढंच नाही तर त्यांनी मराठी लग्नांमध्ये खेळले जाणारे खेळही खेळले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ankita lokhande and vicky jain got married again on national television actress completed mother wish mrj

ताज्या बातम्या