एअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले "कंगना..." | ankita lokhande gets trolled about her recent airport look fan compares her with kangana ranaut | Loksatta

एअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”

हा व्हिडिओ पाहून अंकिताच्या साडीबद्दलही लोकांनी कॉमेंट केली आहे.

एअरपोर्ट लूकमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले “कंगना…”
अंकिता लोखंडे व्हायरल व्हिडिओ | ankita lokhande viral video

टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. या मालिकेतील भूमिकेमुळे अंकिताला चांगलीच लोकप्रियता मिळाली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबरोबर तीची जोडी चांगलीच गाजली, प्रेक्षकांनी त्या दोघांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. अंकिता ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. नवीन फोटोशूट, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याबरोबरच ती वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करत असते.

नुकताच अंकिताचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिच्या लुकवर चाहते विचित्र कॉमेंट करत आहेत. अंकिताचा नुकताच विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे. यामध्ये तिने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साडीतील लुकची चांगलीच चर्चा होत आहे. या साडीमध्ये अंकिताची काही चाहत्यांनी प्रशंसा केली तर काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली बॉयकॉटची मागणी

या व्हिडिओमध्ये अंकिताच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. साडी कुठे नेसली आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारला आहे. कमरेच्या बरीच खाली साडी नेसल्याने लोकांनी अंकिताला ट्रोल केलं आहे. याबरोबरच अंकिताचा हा नवा लुक पाहून कॉमेंटमध्ये लोकांनी तिची तुलना थेट कंगना रनौतशी केली आहे. या बॅकलेस ब्लाऊजमध्ये अंकिता हुबेहूब कंगनासारखी दिसत असल्याचं लोकांनी म्हंटलं आहे.

अंकिता विकी जैनबरोबर विवाहबंधनात अडकल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मध्यंतरी अंकिता गरोदर असल्याची अफवा पसरली होती, पण नंतर त्यात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तिचे चाहते मात्र तिच्याकडून ही गोड बातमी ऐकण्यासाठी आतुर आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बॉलिवूडमधील नकारात्मक विचारांच्या लोकांवर टीका करत करण जोहर म्हणाला, “मी प्रत्येकाच्या…”

संबंधित बातम्या

विश्लेषण : ‘कांतारा’ चित्रपटातील ‘वराह रुपम’ गाण्यावरचे आक्षेप कोर्टाने फेटाळले; बंदी उठवण्याचे आदेश; नेमका काय होता वाद?
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘आई म्हणून असलेल्या जबाबदारीला अधिक प्राधान्य दिले’
हिजाबला विरोध करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला भारतात येण्यास इराणकडून बंदी
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रचाराची धामधूम संपली
‘तृणमूल’च्या सभास्थळाजवळ स्फोट, तीन जण ठार
मोदींबाबत अपशब्द ही काँग्रेससाठी नित्याची बाब !
भारतीय हद्दीत चीनचे निवारे; मोदी सरकार गप्प का? काँग्रेसचा सवाल
‘साथ सोबत’ पोस्टर प्रकाशित