टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंकिता गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली. ती अनेकदा पतीसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे जैन परंपरेनुसार पूजा करताना दिसत आहे.

अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती रितीरिवाजानुसार पूजा करताना दिसत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे काही कृत्य पाहून चाहते तिच्यावर संतापले आणि तिला ट्रोल करत आहेत. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अंकिता लाल रंगाच्या साडीत पारंपारिक पोशाखात दिसत आहे. तर तिचा पती विकी जैननेही पारंपारिक पोशाख परिधान केलेला दिसत आहे. मात्र, पूजेच्या वेळी अभिनेत्रीच्या काही कृती सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरल्या नाहीत आणि युजर्सनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
आणखीवाचा- फ्लॉप चित्रपटांनंतरही अक्षयची जादू कायम, ‘कठपुतली’साठी घेतलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन

a girl cleaning shaved by sitting in salon
अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल
Surya's revelations about Bumrah
MI vs RCB : जसप्रीत बुमराहला नेट्समध्ये खेळायला घाबरतो सूर्यकुमार यादव, स्वत:च केला खुलासा; म्हणाला तो…
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Loksatta vasturang On the occasion of Gudi Padwa home purchase investment
गुढीपाडवा आणि गृहखरेदी

व्हिडिओमध्ये अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती अनेक ठिकाणी पूजेदरम्यान कॅमेरासमोर पोज देतानाही दिसत आहे. लोकांना अभिनेत्रीचा हा अंदाज आवडलेला नाही आणि त्यांनी कमेंट करून अभिनेत्रीला ट्रोल केले. एका युजरने कमेंट करताना लिहिलं “पूजेमध्येही डान्स सुरू आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “देवाचा आदर करा, इथेही एक नाटकं सुरू आहेत.” आणखी एका युजरने लिहिलं, “सर्वकाही रेकॉर्ड करणं आवश्यक आहे का?” याशिवाय “पूजा पाठातही अभिनय करतेय” असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- “सध्या तर मी स्वतःच…” प्रेग्नन्सीच्या प्रश्नावर अंकिता लोखंडेची भन्नाट प्रतिक्रिया

याशिवाय अनेक युजर्स अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकेकीकडे अंकिताला ट्रोल केलं जात असलं तरी अनेक चाहते अभिनेत्री आणि तिच्या पतीची प्रशंसा करताना दिसत आहेत. काहीजण असे आहेत ज्यांना तिचे हे धार्मिक रूप आवडले आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, “देवा आशीर्वाद द्या.” दरम्यान या व्हिडीओमध्ये लाल साडी आणि मॅचिंग ज्वेलरीमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तर तिचा पती विकी जैननेही धोतर परिधान केलेलं दिसत आहे.