scorecardresearch

…आणि भर पार्टीत अंकिताने सगळ्यांसमोरच बॉयफ्रेण्डला केलं किस, सोशल मीडियावर चर्चा

अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

…आणि भर पार्टीत अंकिताने सगळ्यांसमोरच बॉयफ्रेण्डला केलं किस, सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. सध्या अंकिता बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शनिवारी अंकिता आणि विक्की जैनने मित्रांसोबत दिवाळी पार्टीची धमाल केली आहे. या दिवाळी पार्टीतील अनेक व्हिडीओ अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. ज्यात अकिंता विक्की जैनला भर पार्टीत किस करताना दिसतेय.

अंकिताने तिच्या इन्स्टास्टोरीला काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तिने लाल रंगाची साडी परिधान केल्याचं दिसतं. तर गळ्यात तिने हेवी नेकलेस घातला आहे. यात अंकिता मित्र- मैत्रिणींसोबतच बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत नाचताना दिसत आहे. एका व्हिडीओत अंकिता विक्कीसोबत नाचत असतानाच त्याला सर्वांसमोर किस करताना दिसत आहे.

आर्यन खानला ‘या’ ३ कठोर नियमांचे करावे लागणार पालन

अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अंकिताने या आधीदेखील विक्की जैनसोबतच अनेक फोटो आणि व्हि़डीओ शेअर केले आहेत.

पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिता घराघरात पोहचली. त्यानंतर तिने कंगना रणौतच्या स्टारर ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसचं टाइगर श्रॉफच्या ‘बाघी 3’ सिनेमातूनही तिने महत्वाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-10-2021 at 11:25 IST

संबंधित बातम्या