ट्रोल करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या फॅन्सना अंकिताचे बेधडक उत्तर, म्हणाली….

सुशांतचे चाहते त्याच्या निधनानंतर,अंकिता पूर्वीसारखेच आनंदी जीवन जगत आहे हे बघून अंकितालाच दोषी ठरवत आहेत.

sushant-shingh
(Photo-Loksatta File Images)

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकाली निधनाने फक्त त्याचे कुटूंबिय नव्हे तर त्याच्या फॅन्सनाही मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेला बराच वेळ लागला होता सुशांतने १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. जरी वर्ष उलटून गेले असले तरी अजून  नक्की काय झाले ते समोर आले नाही आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयचा अजुनही तपास सुरू आहे आणि रिया चक्रवर्तीचीही अनेक वेळा चौकशी झाली आहे. मात्र या सर्वांमध्ये एसएसआर चाहत्यांच्या निशण्यावर अंकिता लोखंडेवर नेहमीच असते. यावर आता अंकिताने तिचे मतं व्यक्त केले आहे.

अंकिता आणि सुशांतची भेट ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर झाली. सुरवातीला मैत्री आणि नंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. जवळ-जवळ सहा वर्ष एकत्र राहिल्या नंतर अंकिता आणि सुशांतने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने अभिनेत्री क्रीती सॅनोनसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि निधनापूर्वी तो रिया चक्रवर्ती सोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र  सुशांतचे चाहते त्याच्या निधनानंतर, अंकिता पूर्वीसारखेच आनंदी जीवन जगत हे बघून अंकितालाच दोषी ठरवत आहेत. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने या ट्रोलर्सना उत्तर देत दिले आहे. ती म्हणते, “लोकांना वाटतं तेव्हा ते मला देवी मानतात, वाटतं तेव्हा पायदळी तुडवतात.. गेल्या चार वर्षांपासून मी सुशांतच्या आयुष्यात नाही असे मला कधी वाटले नाही. दुसरं कुणाचा तरी राग माझ्यावर काढू नका. पण यासाठी मी काही करु शकत नाही. मला माहिती आहे मी काय करत आहे आणि मला कोणत्या गोष्टींना समोरे जावे लागले हे देखील माहिती आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

सुशांत आणि रिया यांच्या नात्या बद्दल बोलताना पुढे ती म्हणाली, “मला सुशांत आणि रियामधील असलेल्या नात्या बद्दल माहितीसुद्धा नव्हते…मी कधीच तिच्याशी बोलले नाही…कारण माझा काहीच संबंध नाही; ज्याच्याशी माझा संबंध होता, मी त्याच्यासाठी लढले.” दरम्यान अंकिता आणि रिया कलर्स वरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १५’ सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र या चर्चा खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ankita lokhande reacts to fans who trolled her for living happy life after sushant singh death aad