गेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनेते अन्नू कपूर अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अन्नू कपूर यांना अभिनय क्षेत्रात यायचं नव्हत. अन्नू कपूर यांना अभिनेता नव्हे तर आयएएस (IAS) अधिकारी व्हायचं होतं. त्यांचे आजोबा तसचं काकांनी स्वातंत्र्य लढाईत सहभाग घेतला होता. देशासाठी योगदान देणाऱ्या आपल्या कुटुंबियांप्रमाणेच अन्नू कपूर यांनाही देश सेवा करायची होती. बारावीला त्यांना ९३ टक्के गुण मिळाले होते. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचं आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं. नाइलाजास्तव कुंटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी वडिलांच्या थिएटर कंपनीत काम करणं सुरु केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्नू कपूर यांनी नुकतीच हिंदूस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी करियरसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसचं यावेळी त्यांनी लेखिका अरुंधती रॉय यांना विश्वासघाती म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आयएएस (IAS) अधिकारी बनून देशसेवा करणं शक्य नसलं तरी एक अभिनेता म्हणून आपण देशाची खूपच गांभिर्याने सेवा करत असल्याचं ते या मुलाखतीत म्हणाले. तसंच राजकारण येण्यात काडीमात्रही रस नसल्याच त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी राजकारणासाठी योग्य नाही. एका राजकारण्यासाठी लागणारं कौशल्य माझ्यात नाही.” असं ते म्हणाले

लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर गंभीर आरोप

अन्नू कपूर यांनी या मुलाखतीत बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अरुंधती रॉय यांनी भारताचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अभिनयाबद्दल ते म्हणाले की ” ओटीटी व्यवसायात जे वरिष्ठ स्थानांवर बसले आहेत ते सर्व जाहिरात क्षेत्रातून आलेले आहेत. या सर्वांना सगळं काही एका मिनिटात दाखवायचं आहे. जाहिराती माध्यमातून गुणवत्ता नसलेल्या गोष्टी एक खोटं विश्व निर्माण करून विकण्याचा प्रयत्न केला जातो. आता तर सिनेमाचं देखील तेच झालंय. सिनेमांमध्ये तुम्ही एका अभिनेत्याला एक खोटं पात्र रंगवायला सांगता मात्र याचवेळी ते पात्र वास्तविक वाटवं, लोकांना खरं वाटावं अशी अपेक्षा असते.”

हे देखील वाचा: “त्यांनी देशासोबत विश्वासघात केलाय”, लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर अन्नू कपूर यांचे आरोप

पुढे एक उदाहरण देताना ते मुलाखतकार पत्रकाराला म्हणाले, “समजा तुम्ही अमांडा नावाच्या एक अभिनेत्री आहात आणि मी तुम्हाला अभिनेत्री म्हणून घेतलं. यावेळी मी तुम्हाला तुमची ओळख विसरुन अरुंधती रॉय हे पात्र साकारायला सांगतो. मात्र याचवेळी तुम्ही या पात्रात जिवंतपणा आणावा, ते वास्तविक आहे असं वाटावं अशी अपेक्षा करतो. याला अभिनय म्हणतात.” असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “बरं संपूर्ण आदराने मी अरुंधती रॉय याचं नाव तर मी सहजच घेतलं. ज्यांनी नेक वेळा देशाचा विश्वासघात केला आहे.”

भारतीतील व्यवस्थेबद्दल व्यक्त केलं दु:ख

तर राजकारणातील प्रवेशाबद्दल ते म्हणाले, “मी राजकारणासाठी योग्य नाही. एका शोमध्ये मी पालिटिशियन म्हणजेच ‘राजकारणी’ या शब्दाची व्याख्या सांगितली होती. “पॉली म्हणजे खूप किंवा असभ्य भाषा आणि टिशियन म्हणजे रांगणारे किडे. राजकारणी असोत की न्यायव्यवस्थेतले किंवा नोकरशाहीतले सगळेच या व्यवस्थेचा भाग आहेत आणि दुर्दैवाने आपली व्यवस्था ही जगातील सर्वात भ्रष्ट, खोटी आणि दिखाऊ व्यवस्था आहे. मला स्वित्झर्लंड, अमेरिका किंवा ग्वाटेमाला या देशांची चिंता नाही मला भारताची चिंता आहे. मला माझ्या मातृभूमिबद्दल गांभिर्य आहे आणि मला भारताबद्दल दया येते.

हे देखील वाचा: Video : “तिचे आमच्या आयुष्यात आगमन झाले अन्…” बहिणीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भर कार्यक्रमात अक्षय कुमारला अश्रू अनावर

अन्नू कपूर ‘क्रॅश कोर्स’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विजय वर्मा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annu kapoor blams writer arundhati roy she has betrayed the country several times kpw
First published on: 05-08-2022 at 14:26 IST