scorecardresearch

अन्नू कपूर यांना माहीत नाही कोण आहे आमिर खान? पाहा काय म्हणाले अभिनेता

आमिर खानबाबत अन्नू कपूर यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

अन्नू कपूर यांना माहीत नाही कोण आहे आमिर खान? पाहा काय म्हणाले अभिनेता
एका पत्रकाराने अन्नू कपूर यांना आमिर खानच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाबाबत प्रश्न विचारला होता.

अभिनेता अन्नू कपूर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांना नुकतंच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या प्रश्नावर असं काही उत्तर दिलं की ऐकणारे सगळेच हैराण झाले. अन्नू कपूर असं काही बोलू शकतात यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. मात्र त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अन्नू कपूर यांची वेब सीरिज ‘क्रॅश कोर्स’ नुकतीच अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान एका पत्रकाराने अन्नू कपूर यांना आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबाबत प्रश्न विचारला होता.

फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी अन्नू कपूर यांचा एका व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्रकार अन्नू कपूर यांना, ‘आमिर सरांचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होणार आहे.’ असं बोलताना दिसत आहे. यावर अन्नू कपूर म्हणतात, ‘ते काय आहे? मी चित्रपट पाहत नाही. मला याबद्दल माहिती नाही.’ एवढंच नाही तर अन्नू कपूर यांचा मॅनेजर देखील या दोघांमध्ये हस्तक्षेप करत ‘नो कमेंट्स’ असं म्हणताना दिसतो.

आणखी वाचा- “मी त्याचा तिरस्कार…” एक्स बॉयफ्रेंड विवियन रिचर्ड्सबद्दल नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

अन्नू कपूर पुढे म्हणतात, “नो कॉमेंट्स. मी चित्रपट पाहतच नाही. ना ओळखीच्यांचे ना अनोळखी लोकांचे. मला माहीतही नाही की हा कोण आहे. खरंच. मग त्याच्या चित्रपटाबद्दल मी कसं सांगू? मला याबाबत काहीच कल्पना नाही.” अन्नू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि यूजर्स त्यावर कमेंट करत आहेत. अन्नू कपूर यांना ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबद्दल माहीत नाही, तसेच चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता चित्रपट पाहत नाही हे लोकांच्या पचनी पडत नाहीये.

आणखी वाचा- “त्यांनी देशाचा विश्वासघात केलाय”, लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर अन्नू कपूर यांचे आरोप

एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटलंय, “जर तुम्ही चित्रपट पाहत नाही, तर मग फिल्म इंडस्ट्रीत काम का करता?” आणखी एका युजरने लिहिलं, “त्यांना आमिर खान कोण आहे खरंच माहित नाही का? याशिवाय काही युजर्सनी तर अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया अतिशय असभ्य आणि वाईट आहे असं म्हटलं आहे. यावरून अनेक युजर्स अन्नू कपूर यांना ट्रोल करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Annu kapoor reaction on aamir khan related question i do not know who is he mrj

ताज्या बातम्या