मुलीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर अनसीच्या आईने केला आत्महत्येचा प्रयत्न

अनसी कबीरचे अपघातात निधन झाले आहे.

ansi kabeer, ansi kabeer death, ansi kabeer mother attempt suicide
अनसी कबीरचे अपघातात निधन झाले आहे.

केरळमधील कोच्ची येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलाय. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांचे निधन झाले आहे. दरम्यान, अनसीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर तिच्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर आली आहे.

अनसीच्या आईने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिरावली आहे. त्या बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या घरात सापडल्या असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

अनसीच्या निधनाची बातमी तिच्या नातेवाईकांना मिळाली. हे नातेवाईक तिच्या घराच्या जवळच रहायचे. त्यामुळे ते तिच्या आईला भेटायला आणि तिचे सांत्वन करण्यासाठी घरी गेले. त्यावेळी घराचे दरवाजे हे आतून बंद होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. मुलीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर जणू काही अनसीच्या आईला धक्का बसला आणि त्यांनी हा मोठा निर्णय घेतला.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

अनसीने निधनाआधी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हालर झाली होती. दरम्यान, अनसी काबीर आणि डॉ.अंजना शाहजान या गाडी चालवत असताना, त्यांच्या समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुवनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ansi kabeer s mother attempts suicide after hearing about daughters death dcp

ताज्या बातम्या