scorecardresearch

Premium

अनु मालिक यांच्या वागण्यानं बायको झाली होती नाराज, गायकानं सांगितला डिनर डेटचा ‘तो’ किस्सा

‘सारेगमप’ रिअलिटी शोमध्ये अनु मलिक यांनी त्यांच्या पत्नीसोबतच्या डिनर डेटचा किस्सा शेअर केला.

anu malik, anu malik wife, anu malik instagram, anu malika fashion, sa re ga ma pa show, अनु मलिक, अनु मलिक इन्स्टाग्राम, अनु मलिक पत्नी, सारेगमप शो
अनु मलिक यांनी पत्नी अंजू यांच्या सोबतच्या डिनर डेटचा किस्सा शेअर केला.

गायक अनु मलिक यांचा शायरी करण्याचा अंदाज तर सर्वांना माहीत आहे. त्यांच्या शायरी ऐकण्याचं सर्वच टाळताना दिसतात. ते जेव्हा शायरी करू लागतात तेव्हा सर्वच त्यांच्यापासून दूर पळताना दिसतात. पण एक वेळ अशीही होती की अनु मलिक यांच्या वागण्याला कंटाळून त्यांची पत्नी देखील त्यांच्यापासून दूर राहू लागली होती. नुकतंच सारेगमप रिअलिटी शोमध्ये अनु मलिक यांनी पत्नी अंजू यांच्या सोबतच्या डिनर डेटचा किस्सा शेअर केला.

अनु मलिक यांनी सांगितलेला हा किस्सा ९० च्या दशकातील आहे. जेव्हा अनु मलिक त्यांची पत्नी अंजू यांना घेऊन डिनर डेटला निघाले होते. तेव्हा अनु मलिक यांची पत्नी त्यांच्यासोबत चालण्याऐवजी त्यांच्या पासून दूर दूर राहत होती. अंजू या त्यावेळी अशा वागत होत्या जसं की त्या अनु मलिक यांना ओळखतच नाहीत.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

अनु मलिक यांनी नुकतीच सारेगमप रिअलिटी शोमध्ये खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी अनन्या चक्रवर्ती हिची हेअर स्टाइल पाहून अनु मलिक म्हणाले, ‘मी पण कधीकाळी अशाप्रकारे हेअरस्टाइल करत असे. मला आजही आठवतंय माझी पत्नी आणि मी एकदा डिनरसाठी बाहेर जात होतो. मी तिला सांगितलं होतं की, मी काऊबॉय हॅट आणि लेदर बूट्स घालून जाणार आहे. पण त्या हॅटमध्ये अशाचप्रकारच्या केसांच्या वेण्या घातलेल्या होत्या.’

अनु मलिक पुढे म्हणाले, ‘मी जेव्हा अशा प्रकारचे कपडे आणि स्टाइलमध्ये निघालो तेव्हा माझी पत्नी माझ्यापासून २० पावलं दूर चालू लागली. ती असं दाखवत होती की मला ओळखतच नाही. पण मी माझ्या कपड्यांसाठी आनंदी होतो आणि मला स्वतःवर विश्वास होता. मला खूप गंमत वाटत होती. जेव्हा मी अनन्याचा लुक अंजूला दाखवला तेव्हा तिला सर्व गोष्टी आठवल्या आणि ती हसू लागली.’

दरम्यान अनु मलिक आणि अंजू यांचं लग्न झालं तेव्हा ते दोघंही २१-२२ वर्षांचे होते. दोघंही पहिल्यांदा मिठीबाई कॉलेजमध्ये भेटले होते आणि तिथूनच दोघांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anu malik reveale how his wife got angry because of the way he dress mrj

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×