scorecardresearch

Video: अनुपम खेर यांच्या आईने केला ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

आईचा डान्स पाहून अनुपम खेर यांनी तो व्हिडीओ त्यांच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईने देखील या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यावर त्यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

अनुपम खेर यांनी आई दुलारी देवी यांचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांनी ‘हा एक चमत्कार आहे, धन्यवाद वृंदा खेर आईचा हा व्हिडीओ शूट करण्यासाठी’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्यासोबत हॅशटॅग दुलारी रॉक्स असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : मी त्याचा विचार करुनच स्वत:ला…; अभिनेत्रीनं केला शाहीद आफ्रिदीवरील प्रेमाचा खुलासा

अनुपम खेर या नेहमीच आईसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.

‘पुष्पा : द राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anupam kher mother dulari devi dancing on allu arjun film pushpa song srivalli watch video avb

ताज्या बातम्या