शेवटी आई ती आईच, “तू सुक्या मच्छीप्रमाणे…”, भर व्हिडीओत अनुपम खेर यांची आई संतापली

मॉम्स आर बेस्ट,” असे अनुपम खेर यांनी सांगितले.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांची लोकप्रियता देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. ते नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आजवर अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. मात्र नुकतंच त्यांनी त्यांच्या आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांची आई त्यांना बारीक झाल्यामुळे ओरडताना दिसत आहे.

अनुपम खेर यांनी दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना ते म्हणाले की, “मी माझ्या आईला महिनाभराने भेटलो. मात्र तिने लगेचच मला सुकडा ( म्हणजे अगदी पातळ) असल्याचे म्हटले. त्यानंतर तिचा चित्रविचित्र चेहरा केला. त्यानंतर मी अगदी सुक्या मच्छीप्रमाणे दिसतो. पण एवढं बोलूनही तिने माझ्यासाठी दोन छान शर्ट आणले. मी तिला यावेळी पराठा भरवला. मॉम्स आर बेस्ट,” असे अनुपम खेर यांनी सांगितले.

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत त्यांची आई दिसत आहे. दुलारी खेर असे त्यांच्या आईचे नाव आहे. यात त्यांची आई त्यांना बारीक होण्यावरुन ओरडताना दिसत आहे. यावेळी अनुपम खेर विचारतात, “मी बारीक झालोय का?”, त्यावर त्यांची आई म्हणते, “तुझं पोट दिसत नाही, गाल आत गेलेत. फक्त एवढं एवढंस खातोस.” यावर अनुपम खेर त्यांना सांगतात, “अगं आई मी पराठा खातोय, तुला मी बारीक झालोय असं का वाटतंय?” त्यावर त्यांची आई चित्रविचत्र चेहरा करत त्यांना ओरडते.

“मी या वयात तुझ्यापेक्षा चांगली दिसते. माणसाने चांगलं दिसायला हवं. पण तू अगदी सुकलेल्या मच्छीप्रमाणे दिसतोस. आता मला बघ, मी आधी जाड होती, पण आता बारीक झाल्यामुळे चांगली दिसते,” असे त्या म्हणाल्या. यावर अनुपम खेर म्हणाले की, “मग मी बारीक झालेला तुला आवडत नाही?” त्यावर त्या म्हणाल्या, “अजिबात नाही.” तुझ्या मते “मी जाड असलो पाहिजे का?” तू माझ्यासाठी शर्ट आणलेस. छान शर्ट आहे. पण तुला माझी शर्टाची साईज माहितीय ना? असे ते गमतीत विचारतात. त्यावर त्या हसतात.

यानंतर अनुपम खेर आपल्या आईला पराठा भरवतात. हा पराठा खाऊन त्या अनुपम खेर यांचे कौतुक करत तो चांगला झालाय असे सांगतात. अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anupam kher mother dulari said him you look like dried fish criticize for losing weight watch video nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या