बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित पुष्कर नाथ यांची भूमिका साकारली होती. अनुपम खेर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच अनुपम खेर यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर भाष्य केले. त्यासोबतच त्यांनी जीडीपीबद्दलही त्यांचे मत मांडले.

अनुपम खेर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते देशात वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, घसरत जाणारा जीडीपी यावर भाष्य केले आहे. त्यात ते म्हणाले, “सायकल चालवणे हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी म्हणजे जीडीपीसाठी खूप हानिकारक आहे. हे जरी मजेशीर वाटत असेल तरी ते कटू सत्य आहे.”

दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील ५ व्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता, आता ‘ही’ मोहिम दिसणार रुपेरी पडद्यावर

यापुढे ते म्हणतात, “एखादा सायकल चालवणारा व्यक्ती देशासाठी फार मोठी समस्या आहे. कारण तो कधीही गाडी खरेदी करत नाही, तो कर्ज घेत नाही, गाडीचा विमा करत नाही. तो इंधन खरेदी करत नाही. त्याला गाडीची सर्विस करावी लागत नाही. त्याला पैसे देऊन गाडीची पार्किंग करावा लागत नाही आणि तो कधीच लठ्ठही होत नाही. हे खरं आहे की निरोगी व्यक्ती अर्थव्यवस्थेसाठी अजिबात योग्य नाही. कारण तो औषधे घेत नाही, त्याला त्याची गरज नाही. तो कधीच रुग्णालयात जात नाही, त्याला त्याची गरज वाटत नाही. तो कधीही डॉक्टरांकडे जात नाही. त्यामुळे ते देशाच्या जीडीपीमध्ये योगदान देत नाही.”

“याउलट, एक फास्ट फूडचे दुकान ३० जणांसाठी नोकऱ्या निर्माण करतो. १० हृदयाचे डॉक्टर, १० दंतचिकित्सक आणि १० वेगवेगळ्या प्रकारचे लोक ज्यांना वजन कमी करायचे असते. पण पायी चालत फिरणारा पादचारी हा यापेक्षा अधिक धोकादायक असतो. कारण पादचारी व्यक्ती सायकलही विकत घेत नाही”, असेही अनुपम खेर यांनी या व्हिडीओत म्हटले.

त्यापुढे ते म्हणाले, ‘हे एक व्यंग होते. यापैकी कोणतीही गोष्ट ते गांभीर्याने घेऊ नका. तसंच असंही बोलू नका की मी सायकलस्वारांची चेष्टा करतो, गरिबांची चेष्टा करतो. दरम्यान अनुपम खेर यांच्या मजेशीर या व्हिडीओवर अनेकजण विविध कमेंट करताना दिसत आहे. तसेच अनेकांना त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ अनेकांना आवडलेला पाहायला मिळत आहे.

दरम्यान अनुपम खेर हे सध्या त्यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटातील अनुपम खेर यांची भूमिकेचे प्रचंड कौतुक केले जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासह मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.