"त्यांना काश्मीरमधील घरी जायचे होते...", वडिलांसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर भावूक | Anupam Kher shares last pic with his father Pushkar Nath with emotional note nrp 97 | Loksatta

“त्यांना काश्मीरमधील घरी जायचे होते…”, वडिलांसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर भावूक

अनेक वर्षांनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

“त्यांना काश्मीरमधील घरी जायचे होते…”, वडिलांसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर भावूक

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडित पुष्कर नाथ यांची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांच्या वडिलांचे नावही पुष्कर नाथ होते. अनेक वर्षांनंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या वडिलांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक भावूक कॅप्शनही दिले आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होऊन २० दिवस उलटले असून या चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांची ही पोस्ट चर्चेत आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतर सलमानने केला अनुपम खेर यांना फोन, म्हणाला “मला…”

अनुपम खेर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी त्यांचे वडिल पुष्कर नाथ यांचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अनुपम खेर यांचे वडिल हे एका खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. तर अनुपम खेर हे त्यांच्या मागे उभे आहेत. त्यांचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहे.

हा फोटो शेअर करताना अनुपम खेर म्हणाले, “माझे वडील पुष्कर नाथ जी यांच्यासोबतचा हा माझा शेवटचा फोटो होता. यानंतर ११ दिवसांनी त्यांच्या मृत्यू झाला. ते एक सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगले. त्यांनी आयुष्यात कधीच कोणाचे मन दुखावले नाही. ते सामान्य माणूस तर होते, पण त्यासोबतच एक असामान्य वडीलही होते. त्यांना काश्मीरमधील त्यांच्या घरी जायचे होते. मी कश्मीर फाइल्स हा चित्रपट त्यांना समर्पित करतो.”

“हा चित्रपट…”, विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाईल्स’वरील वादावर नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली प्रतिक्रिया

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने आतापर्यंत २५३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील अनुपम खेर यांची भूमिकेचे प्रचंड कौतुक केले जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासह मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2022 at 11:25 IST
Next Story
भर रस्त्यात निवेदिता सराफ यांना धमकावत त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण