“सिनेमाचं नाव ओळखा पाहू?”; अनुपम खेर यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनीच केला प्रश्नांचा भडीमार

अनुपम खेर यांनी विचारलेल्या प्रश्नावरून नेटकऱ्यांनीच त्यांना धारेवर धरलं आहे

Anupam-kher-photo-tweet went-viral
Photo-Indian express

बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेते अनुपम खेर आपल्या अभिनयासोबतच त्यांच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते आपल्या चाहत्यांशी सतत संपर्क साधत असतात. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. अनुपम खेर यांचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.अनुपम खेर यांनी ट्वीटरवर एक फोटो ट्वीट केला असून चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. अनुपम यांनी त्यांच्या एका चित्रपटातील एक लूक पोस्ट केला आहे. या पोस्टवर त्यांनी “सिनेमाचं नाव ओळखा पाहू?”असं कॅप्शन दिलं आहे.


हा फोटो ट्वीट करताच, अनुपम खेर यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर ट्रेंड झालं आहे. यावर लाइक्स आणि कमेंन्टसचा वर्षाव होताना दिसून आला. काही नेटकऱ्यांनी हा चित्रपट ओळखण्याचा प्रयत्न केला. तर काही नेटकऱ्यांनी या पोस्टवर संदर्भ नसलेल्या कमेंन्टस केल्याचे दिसून येत आहे. अनुपम खेर यांच्या ट्विटवर एका युजरने ट्वीट केले “आम्हाला या सगळ्यात काही रस नाही. आम्हाला हे जाणून घ्याचे आहे की पेट्रोल, डिझेल, यांच्या दरवाढीवर तुमच्या प्रतिक्रिया हव्या आहेत.” तर दुसरा युजर लिहितो “अबकी बार पेट्रोल १०० बार”.


अनुपम खेर यांचा हा लूक त्यांचा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘स्पेशल २६’ मधला आहे. दरम्यान काही नेटकऱ्यांनी अनुपम खेर यांचा हा एक बेस्ट चित्रपट असल्याचे देखील ट्वीट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anupam kher tweet got trolled aad97

ताज्या बातम्या