“कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे…”

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले आहेत. देशात घडणाऱ्या जवळपास प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यावर ते आपली मते मांडताना दिसतात. अलिकडेच त्यांनी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. या नेटकऱ्यांवर अनुपम खेर संतापले आहेत. “मला पाडवण्याचा प्रयत्न करणारे स्वत:च पडतात”असे ट्विट करुन त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

अवश्य वाचा – JNU प्रकरणातील आरोपींना कधी पकडणार; अनुराग कश्यप संतापला

काय म्हणाले अनुपम खेर?

“ना मी पडलो ना माझ्या अपेक्षा, परंतु मला पाडण्याचा प्रयत्न करणारे लोक मात्र नक्कीच पडले.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुपम खेर यांनी ट्रोलकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अवश्य वाचा – या ७ कारणांमुळं भारतानं न्यूझीलंडवर मिळवला विजय

नसिरुद्दीन शाह यांच्याबाबत काय म्हणाले होते अनुपम खेर?

“नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत माझी स्तुती केली. तो व्हिडीओ मी नुकताच पाहिला. मी नसिरुद्दीन शाह यांचा खुप आदर करतो. त्यामुळे मी कधीच त्यांची निंदा केली नाही. आणि त्यांच्या कुठल्याच वक्तव्याला गांभीर्याने घेतले नाही. तुम्ही आपल्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवले. परंतु यानंतरही तुमचे आयुष्य नैराश्येतच गेले आहे. तुम्ही दिलीप कुमार, राजेश खन्ना, शाहरुख खान, विराट कोहली, अमिताभ बच्चन यांच्यावर देखील टीका केली. परंतु कोणीच तुम्हाला गांभीर्याने घेतले नाही. कारण आम्हाला माहिती आहे, की तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करता त्यामुळे तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरकच कळत नाही. माझ्यावर टीका करण्याचा आनंद मी तुम्हाला भेट करतो. माझ्या रक्तात हिंदूस्तान आहे.”

यापूर्वी नसिरुद्दीन शाह काय म्हणाले होते?

नसिरुद्दीन शाह आपल्या मुलाखतीमध्ये देशामधील सध्याची परिस्थिती, देशात वाढणारा धार्मिक भेदभाव आणि यासंदर्भात चित्रपट सृष्टीमधील मोठी नावं का शांत आहेत याबद्दल मत व्यक्त केलं होतं. “मी ट्विटरवर नाही. ट्विटवर असणाऱ्यांनी आपले काय ते एक ठाम मत तयार करण्याची गरज असल्याचे मत वाटते. अनुपम खेरसारखे लोक या माध्यमांवर खूपच बोलतात. पण त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं नाही. ते विदुषक आहेत. त्यांच्याबरोबर एनएसडी, एनएफटीआयआयमध्ये असणाऱ्यांना विचारुन तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दलची खात्री करुन घेऊ शकता. ते त्यांच्या रक्तातच आहे. तुम्ही त्याबद्दल काहीच करु शकत नाही,” अशा शब्दांमध्ये शाह यांनी खेर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anupam kher tweet viral on social media mppg

Next Story
गॉसिप