scorecardresearch

Video: “ही भारताची लेक…” पी. व्ही. सिंधूच्या घरातील ट्रॉफीज पाहून भारावले अनुपम खेर

यावेळचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिंधूचे कौतुक केले आहे.

Video: “ही भारताची लेक…” पी. व्ही. सिंधूच्या घरातील ट्रॉफीज पाहून भारावले अनुपम खेर

अभिनेते अनुपम खेर हे अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळे आहेत, याची प्रचिती अनेकदा प्रेक्षकांना आली आहे. सोशल मीडियावरही ते बरेच सक्रिय असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी शेअर करत असतात, तसं आणि विविध विषयांवर त्यांचे विचार मांडत असतात. नुकतीच त्यांनी बॅडमिंटन चॅम्पियन पी व्ही सिंधूच्या घरी भेट दिली. त्यावेळी तिची पदकं आणि ट्राॅफीज पाहून ते खूप भारावून गेले. यावेळचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिंधूचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा : “मी आणि दीपिका लवकरच…”, रणवीर सिंगने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

अनुपम खेर म्हणाले, “माझ्या घरी भिंतींवर खूप अवाॅर्ड्स आहेत. पण हे तर कमालच आहे. तिनं घरात एकही जागा सोडली नाहीय. भिंतींवर, कपाटात, जमिनीवर सगळीकडे ट्राॅफीच ट्राॅफी.” त्यानंतर त्यांनी तिला कुठलं अवाॅर्ड कधी मिळालं, पहिलं कुठलं याबद्दलही विचारलं. सिंधूनेही हसत हसत त्यांना सगळी माहिती दिली.

अनुपम खेर यांनी सिंधूच्या घरचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, “तिने मला अत्यंत नम्रपणे सगळ्या ट्रॉफींची सफर घडवली. वयाच्या ८व्या वर्षापासून ती पदकं पटकावतेय. मी खूप भारावून गेलो आहे. ही भारताची लेक आहे. देशाची शान आहे. प्रेरणा देणारी हिरो आहे. जय हो. जय हिंद.”

तर अनुपम खेर यांच्याबरोबरच पीव्ही सिंधूनेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनुपम खेर यांच्या बरोबरचा एक शेअर पोस्ट केला. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमधल्या एकाबरोबर मला वेळ घालवता आला, हे माझं भाग्य आहे. या भेटीदारम्यान आम्ही खूप आठवणी जागवल्या, भरपूर हसलो, आमच्यात छान गप्पा झाल्या. एक तास कुठे गेला कळलंच नाही.”

हेही वाचा : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनुपम खेर यांनी दिली प्रतिक्रिया, ट्वीट करत म्हणाले…

चाहत्यांनी या पोस्टला कमेंट्स करत भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहे. नेटकऱ्यांना अनुपम खेर आणि सिंधूची ही भेट फारच आवडलेली दिसत आहे. सोशल मीडियावर पी व्ही सिंधूचे लोक कौतुक करत आहेतच, त्याचबरोबर अनुपम खेर यांचयाही नम्र आणि दिलखुलास स्वभावाचे नेटकरी कौतुक करत आहेत. दोघांच्या या पोस्टना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून त्या दोघांचे या भेटीदारम्यानचे शेअर खूप व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या