Anupama Parameswaran Narcissistic Abuse Statement: दाक्षिणात्य सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे. तिने तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये दोन वर्षे मानसिक छळ सहन केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले असून, अनुपमाने थेट तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव घेतलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कथित बॉयफ्रेंड अभिनेता ध्रुव विक्रमबरोबरच्या ब्रेकअपबाबत सूचक पोस्ट केल्यानंतर अनुपमाने एक्स बॉयफ्रेंडबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

अनुपमा परमेश्वरनचा रिलेशनशिपमध्ये मानसिक छळ

अनुपमा परमेश्वरनने धन्या वर्माला दिलेल्या मुलाखतीत तिच्या नात्यातील वाईट परिस्थिती आणि मानसिक त्रासाबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर जी पोस्ट केली, ती काही उगाचच मला वाटतं म्हणून अचानकपणे केलेली नाही. मी विचारपूर्वक आणि वेळ घेऊन केलेली ती पोस्ट होती. त्या पोस्टमागे दोन वर्षांच्या वेदना, शारीरिक आणि भावनिक त्रास यांचा अनुभव होता. मी पूर्णपणे यातून सावरल्यानंतर मी ती पोस्ट केली होती.” तिने ‘तुम्हाला तुमची शांतता मिळवायची असेल, तर शेवटी मृत टोक सोडून द्यावं लागतं,’ अशा आशयाची पोस्ट केली होती.

खचल्यासारखं वाटू लागलं होतं – अनुपमा परमेश्वरन

त्यानंतर अनुपमाने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव न घेता सांगितले, “त्या नात्यामुळे खूप त्रास झाला आणि त्याचा शरीरावर परिणाम झाला. या काळामध्ये मी स्वतःला हरवून बसले होते आणि त्यामुळे माझं वजन जास्त प्रमाणात कमी झालं होतं. आयुष्यामध्ये प्रगती होत असली तरी मला आनंद होत नव्हता. उलट, मला अजून खचल्यासारखं वाटू लागलं होतं.”

दोन वर्षे ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा सामना – अनुपमा परमेश्वरन

अनुपमा परमेश्वरन पुढे म्हणाली, “मी दोन वर्षे ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा (narcissistic abuse) सामना केलाय. दररोज समोरच्या व्यक्तीची कोणती बाजू पाहायला मिळेल, याची भीती वाटत होती. हे शंकरच्या ‘अन्नियन’ चित्रपटातील हीरोप्रमाणे वागणं आहे. एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी रूपं असतात. एखाद्या दिवशी तो आपल्यावर खूप जास्त प्रेम करील किंवा खूप काळजी असल्याचं दाखवून देईल. जगातील सर्वांत भाग्यवान व्यक्ती असल्यासारखी वागणूक देईल. पण, दुसऱ्याच दिवशी त्याची सर्वांत क्रूर बाजू समोर येईल. आजूबाजूला काय घडत आहे याची त्याला अजिबात पर्वा नसेल. त्यानंतर पुढच्या दिवशी तो सर्व चुका मान्य करून लहान मुलासारखा रडेल. सर्व चुकांसाठी माफी मागेल आणि पुन्हा असं करणार नाही, असा शब्द देईल आणि त्यानंतर पुन्हा हेच चक्र सुरू राहील.”

पुढे अनुपमा परमेश्वरनने तिला याबद्दल सोशल मीडियावर समजल्याचे दिसून आले. ती म्हणाली, “मी पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये मेडोना सेबॅस्टियनला या प्रकारच्या शोषणाबद्दल बोलताना पाहिले होते. ते बघून तेव्हा माझी खूप प्रतिक्रिया तीव्र होती आणि माझे माय थरथर कापत होते. अजूनही असे खूप जण आहेत, ज्यांना नार्सिसिस्टिक ॲब्यूजबद्दलची माहिती नाही.”

कधी भेटले होते अनुपमा परमेश्वरन आणि धुव्र विक्रम?

दरम्यान, अनुपमा आणि ध्रुव विक्रम यांच्या नात्याच्या चर्चा २०२५ मध्ये ‘बायसन कालामाडन’च्या शूटिंग आणि प्रमोशनदरम्यान सुरू झाल्या होत्या. दोघांनीही या आतापर्यंत सार्वजनिकपणे कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती; पण अनुपमा परमेश्वरनने केलेल्या या वक्तव्यामुळे दोघेही चर्चेमध्ये आले आहेत.