महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. लोकप्रिय अभिनेत्री अनुषा दांडेकरने यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

अनुषाने याआधी अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. ऑस्ट्रेलियात जन्म आणि शिक्षण झाल्यानंतर अनुषा मनोरंजनसृष्टीत करिअर करण्यासाठी १९ वर्षांची असताना भारतात कायमची राहायला आली. त्यानंतर अनेक शोसाठी तिने सूत्रसंचालनाचं काम केलं, अनेक कार्यक्रमांमध्ये ती परीक्षक म्हणून दिसली. नंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली.

Sonakshi praised director Aditya Sarpotdar
सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
Zombivli, Sonakshi Sinha, sonakshi sinha new movie,
सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
gauri kulkarni shares funny post on ambani increase jio recharge prices
“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात…”, अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…
Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video
नीता अंबानी रोहित शर्माला मिठी मारून रडल्या, तर सूर्याला.. राधिका- अनंतच्या संगीत सोहळ्यातील नवा Video पाहिलात का?
gaurav more write special post for satya movie
२६ वर्षांपूर्वीच्या बॉलीवूड चित्रपटासाठी गौरव मोरेची खास पोस्ट! शाहरुख-सलमान नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारलीये प्रमुख भूमिका
Ranveer Singh
कल्की चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंह पत्नी दीपिकाच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “त्या प्रत्येक क्षणाला…”
What Eknath Shinde Said?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार? पोस्टर लाँचच्या वेळी सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

मुळची पुण्याची असलेली अनुषा मराठी चित्रपटांमध्येही झळकायला लागली. नुकतीच अनुषा ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात झळकली होती. यात ती पहिल्यांदाच अभिनेता भूषण प्रधानला भेटली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भूषणने अनुषाला खूप मदत केली. अनुषाने भूषणसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… उर्फी जावेदने खरंच केलंय टक्कल? व्हायरल झालेला फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

अनुषाने भूषण आणि तिचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी जास्त चित्रपट केले नाहीत. मी मुख्यतः सूत्रसंचालन करत होते. कोणत्याही कलाकाराचं सहकलाकार असणं ही एक वेगळी भावना असते, कारण तुम्हाला एक विशिष्ट पात्र साकारायचं असतं आणि त्यादरम्यान तुम्हाला नुकत्याच भेटलेल्या लोकांसोबत खूप वेळ घालवायचा असतो. हे अशा एका नात्याचे चक्र आहे, ज्यासाठी तुम्ही खरोखर तयार नसता.”

अनुषा पुढे म्हणाली, “आज मला एका खास सहकलाकाराचे आभार मानायचे आहेत, ज्याने प्रत्येक पावलावर माझी मदत केलीय, मला धीर देलाय. प्रोफेशनल असूनही त्याने मला उत्तम काम करण्यासाठी नेहमीच वेळ दिला आहे.”

“सेटवर बाकीच्यांइतकं आत्मविश्वासू नसणं हे खूप भीतीदायक असतं. पण, जेव्हा तुमच्याकडे अशी व्यक्ती असते जी तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तो सगळा प्रवास तुमच्यासाठी किती सोप्पा होऊन जातो. जेव्हा ते स्वत: उत्तम कलाकार असतात, पण ते तुम्हाला कधीच त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाहीत; ही गोष्ट खरंच खूप मोठी असते आणि यासाठी धन्यवाद भूषण. माझा उत्तम सहकलाकार बनल्याबद्दल तुझे खूप आभार”, असंही अनुषा म्हणाली.

हेही वाचा… ‘बिग बॉस ओटीटी- ३’ मध्ये सलमान खानऐवजी दिसणार संजय दत्त अन्….?, शोच्या निर्मात्यांनी ‘या’ बॉलीवूड कलाकारांशी साधला संपर्क

अनुषा भूषणचं कौतुक करत म्हणाली, “भूषण तू मला खूप काही शिकवलंस. मी तुझी सदैव कृतज्ञ राहीन. शूटिंगदरम्यान मला शब्द उच्चारण्यात अडचण येत होती, तेव्हा मी माझे डायलॉग्स पुन्हा पुन्हा बोलत होते, त्यावेळी तू कधीच माझ्यावर हसला नाहीस. त्याऐवजी मी ते बरोबर करेन याची खात्री करण्यासाठी तू मला जास्त वेळ दिलास.”

“या चित्रपटानंतरही जेव्हा तू दुसर्‍या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतास तेव्हा तू मला माझ्या प्रत्येक डायलॉगच्या व्हॉईस नोट्स पाठवल्यास, कारण मी माझं डबिंग उत्तमरित्या करू शकेन. तुला खूप सारे धन्यवाद, मला तुझ्याबरोबर काम करायला खूप आवडलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!” असंही अनुषा म्हणाली.

हेही वाचा… प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र मत न देताच परतली; कारण सांगत म्हणाली, “वोटिंग ऑफिसरची…”

दरम्यान, ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात अनुषा दांडेकर आणि भूषण प्रधानसह, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, समीर धर्माधिकारी, सचिन खेडेकर, शिवाजी साटम, शरद पोंक्षे हे कलाकार आहेत.