“बचपन का प्यार” व्हायरल गाण्याने अनुष्का शर्माची उडवली झोप

सहदेव दिर्दो या लहान मुलाने गायलेलं हे गाणं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

anushka-shrma
(File Photo-Anushka Sharma)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलाच्या गाण्याने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. सहदेव दिर्दो या मुलाचा “जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार” या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अनेकांच्या तोंडी सध्या हेच गाणं ऐकू येतयं आणि म्हणूनच की काय बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील या गाण्याने चांगलीच भुरळ घातल्याचं दिसतंय. अनुष्काच्या डोक्यातून या गाण्याचे बोल निघण्याचं काही नाव घेत नाहित आणि त्यामुळे तिची रात्रीची झोपही उडालीय.

अनुष्काने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीला एक धमाल पोस्ट शेअर केलीय. अनुष्काने इनस्टास्टोरीला एक मजेशीर मीम शेअर केलंय. यात एक व्यक्ती रात्री झोपण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मात्र त्याच्या डोक्यात सतत ‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार’ गाणं फिरत असल्याने त्याला झोप लागणं कठिण झालंय. हे मीम शेअर करत अनुष्काने हसण्याचे स्माईली शेअर केले आहेत.

(File Photo-Anushka Sharma)

पहा फोटो:आलिया भट्टने रणबीर कपूरची ‘ही’ गोष्ट चोरली; सेल्फी शेअर करत म्हणाली…

खरं तर सहदेव दिर्दो या लहान मुलाने गायलेलं हे गाणं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. २०१९ साली सहदेवच्या एका शिक्षकाने हा व्हिडीओ रकॉर्ड केला होता. यात सहदेवने ‘बचपन का प्यार’ हे गाणं गायलंय. सहदेवने गाणं गायल्यानंतर अनेक लोक हसू लागले होते. त्यानंतर रॅपर आणि गायक बादशहाने या गाण्याचं रिमिक्स वर्जन शेअर केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by PATNA in HD (@patnahd)

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमुळे सहदेवला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. बुधवारी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेत त्याचा सन्मान केला. कॉमेडियन भारती सिंह, कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरीने देखील ‘द कपिल शर्मा’ शोच्या प्रोमोमध्ये या गाण्यावर ठेका धरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anushaka sharma share funny meme as she cant sleep bachpan ka pyar viral song in her head kpw