सुनिल शेट्टीची मुलगी आथिया बनली अनुष्का शर्माची फोटोग्राफर, यूकेमध्ये दोघीही फिरत आहेत एकत्र

अनुष्का-विराट आणि आथिया शेट्टी-केएल राहुल हे दोन्ही कपल यूकेमध्ये एकत्र एन्जॉय करताना दिसून येत आहेत.

Anushka-Sharma-1200
(Photo: Anushka Sharma/Instagram)

अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून पती विराट कोहली आणि मुलगी वामिसासोबत यूकेमध्ये आहे. एकीकडे विराट त्याच्या टीमसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनश‍ीप फायनल्ससाठी यूकेमध्ये पोहोचलाय. तर दुसरीकडे अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथ‍िया शेट्टी सुद्धा क्रिकेटर केएल राहुल आणि तिचा भाऊ अहान शेट्टीसोबत यूकेमध्येच एन्जॉय करताना दिसून येतेय.

अनुष्का शर्मा आणि आथिया शेट्टी या दोघीही यूकेमध्ये आहेत, हे अनुष्का शर्माच्या नव्या पोस्टवरून स्पष्टपणे दिसून येतंय. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आथियाने क्लिक केलेला एक फोटो शेअर केलाय. व्हाइट शर्ट, लाइट ब्लू डेनिम्स परिधान करून त्यावर लाल रंगाच्या बॅकड्रॉपमध्ये अनुष्का शर्माचा क्लिक केलेल्या या फोटोमधून अथ‍ियाचं फोटोग्राफी स्क‍िल झळकून येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

यापूर्वी सुद्धा अनुष्का शर्माने यूकेमधील काही लोकेशन्सवरील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्याच लोकेशनवरून आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे फोटो त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून शेअर केले होते. यावरून आथिया शेट्टी केएल राहुलसोबत आणि अनुष्का शर्मा विराटसोबत एकत्र त्या लोकेशन गेले असावेत, असा अंदाज लावण्यास सुरूवात झालीच होती. पण त्यानंतर आता अनुष्का शर्माने नुकतंच शेअर केलेल्या नव्या फोटोवरून याची खात्री पटली.

या दोन्ही फोटोंध्ये एकच लोकेशन

काही दिवसांपूर्वीच अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत यूकेमधल्या रस्त्यांवर फिरताना एक फॅनने दोघांना स्पॉट केलं होतं. त्यावेळी त्या फॅनने तिचे काही फोटोज क्लिक केले होते. हे फोटोज अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या फोटोमध्ये अनुष्काच्या मागे काही सुंदर काम केलेली घरे दिसून येत आहेत. घरांची रांग असलेल्या रस्त्यावर फिरताना तिने हे फोटोज शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जे फोटोज शेअर केले आहेत, त्याचे लोकेशन अनुष्का शर्माच्या लोकेशन्सशी मिळते जुळते दिसून आले. आथिया शेट्टीने शेअर केलेल्या सेल्फीमध्ये तिच्यामागे तसेच सुंदर घरे आणि इमारती दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

त्यामूळे अनुष्का शर्मा आणि आथिया शेट्टी या दोघींच्या वेगवेगळ्या पोस्टवरून हे मात्र सिद्ध झालंय, की दोघेही एकत्र यूके एन्जॉय करत आहेत. या दोघी आपल्या वेगवेगळ्या फोटोंमधून इंग्लंडचं सौंदर्य फॅन्स पर्यंत पोहोचवत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anushka sharma athiya shetty hanging together in uk photos prp