अनुष्काने विराटशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या ‘विरुष्का’ची लव्हस्टोरी

जाणून घ्या कारण…

निखळ हास्य आणि उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. आज १ मे रोजी अनुष्काचा वाढदिवस आहे. अनुष्काने ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे या दोघांची लग्नाची जितकी चर्चा रंगली तितकीच त्यांच्या अफेअर्सचीही रंगली होती. फार कमी जणांना माहित असेल लग्न करण्यापूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र एकमेकांना डेट करत असताना या दोघांनी २०१५ मध्ये ब्रेकअप केला होता. इतकंच नाही तर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलं होतं. विराटला २०१५मध्येच लग्न करायचं होतं. मात्र अनुष्काने त्यावेळी लग्नाला नकार दिला होता,असं म्हटलं जातं.

आणखी वाचा : विद्या बालनने सांगितले बेडरुम सीक्रेट, जाणून घ्या काय आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

विराटला अनुष्कासोबत २०१५ मध्येच लग्न करायचं होतं. मात्र त्यावेळी अनुष्काला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यामुळे तिने विराटच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. याचकारणास्तव या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोदेखील केलं. मात्र त्यांच्यातील हा वाद फार काळ टिकला नाही. ते एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याची जाणीवर दोघांना झाली आणि ते पुन्हा एकत्र आले. दरम्यान, विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. या दोघांच्या लग्नाच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव वामिका आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anushka sharma birthday special know about anushka virat kohli love story avb