scorecardresearch

प्रियांका चोप्राला आई झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिला प्रेमळ सल्ला, म्हणाली “आता रात्री…”

अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे.

बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बाळाची सोशल मीडियावर चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सरोगसीच्या मदतीने आई झाल्यानंतर प्रियांकावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. नुकतंच अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे. त्यासोबत त्यांना एक सल्लाही दिला आहे.

अनुष्का शर्मा ही तिच्या इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने प्रियांका आणि निकचे अभिनंदन केले आहे. “प्रियांका आणि निक तुमचे खूप खूप अभिनंदन. आता रात्री जागण्यासाठी तयार राहा. त्यासोबतच भरपूर आनंद आणि प्रेमासाठी सज्ज व्हा. तुमच्या बाळाला खूप प्रेम,” असे अनुष्का म्हणाली. त्यासोबत अनुष्काने दोन हार्ट इमोजीही त्या पोस्टमध्ये लिहिले आहेत.

दरम्यान प्रियांका चोप्रानं शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. त्या दोघांनी ही पोस्ट करताना म्हटले की, ‘आम्ही सरोगसीच्याद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही. त्यानंतर प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राने तिला मुलगी झाल्याची माहिती दिली होती.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आले कारण

प्रियांका चोप्राशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं बाळ २७ व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. नियोजनानुसार बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे. ते बाळ निरोगी झाल्यानंतरच या मुलाला ते तिच्या घरी आणणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anushka sharma congratulates priyanka chopra and nick jonas as they welcome a baby girl nrp

ताज्या बातम्या