अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेपटू विराट कोहली यांच्या नात्याबद्दल आता अनेकांनाच ठाऊक आहे. विविध कार्यक्रमांनासुद्धा अनुष्का आणि विराट अनेकदा जोडीने हजेरी लावतात. त्यामुळे हल्ली कोणत्याही कार्यक्रमामध्ये या दोघांपैकी कोणी एक गेले तर त्यांना एकमेकांबद्दलचे प्रश्न हमखासच विचारले जातात. असाच अक प्रसंग नुकताच घडला. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ज्यावेळी अनुष्काला तिच्या मते सर्वात हॅण्डसम व्यक्ती कोण आहे? असे विचारण्यात आले. त्यावेळी अनेकांनाच वाटले की या प्रश्नाचे उत्तर देताना अनुष्का विराटचे नाव घेईल. पण, तिने असे काहीही केले नाही.
अनुष्काने ‘पटियाला हाऊस’ या चित्रपटामध्ये तिच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेल्या अभिनेत्याचे म्हणजेच अक्षय कुमारचे नाव सर्वाधिक हॅण्डसम व्यक्ती म्हणून घेतले. अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रभावी पुरुष आहे. त्याला कोणतीही गोष्ट शोभून दिसते, असेही ती म्हणाली. खिलाडी कुमारच्या प्रशंसनार्थ वक्तव्य करत असताना अनुष्काने त्याला भारतातील जॉर्ज क्लूनी म्हटले आहे. त्यामुळे मासिकातर्फे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अनुष्काने विराटचे नाव डावलून खिलाडी कुमारच्या नावाला पसंती दिली आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान, चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर अनुष्का लवकरच ‘द रिंग’ आणि ‘फिल्लौरी’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द रिंग’ या चित्रटामध्ये अनुष्का पुन्हा एकदा किंग खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझसोबत ती ‘फिल्लौरी’ या चित्रपटातून झळकणार आहे. त्यामुळे येत्या वर्षांत अनुष्काच्या चित्रपटांना नजराणाच प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.




अनुष्का लवकरच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहे. प्रेक्षकांनी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांच्यातली मैत्री पाहिलीच. पण, आता अशीच काहीशी मैत्री अनुष्का शर्मा आणि कतरिन कैफमध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसानी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चॅट शो मध्ये कतरिना आणि अनुष्का खूप सारी धम्माल करताना दिसतील.