अनुष्का शर्माच्या ‘या’ ड्रेसची किंमत ऐकून व्हाल हैराण; तुम्ही देखील खरेदी कराल या किंमतीचा ड्रेस

सेलिब्रिटींचे ड्रेस म्हटलं की डोळ्यासमोर लाखोंच्या किंमती फिरू लागतात. पण अनुष्का शर्माच्या या ड्रेसची किंमत ही जास्त नाही तर कमी असल्यामुळे जास्त चर्चेचा विषय बनलाय.

anushka-sharma-in-rs-1k mini-cut-out-dress-looks
(Photo: Twitter/virat_kohli_18_club)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या चित्रपटांसोबतच हटके व आकर्षक स्टाइलसाठीही चर्चेत येत असते. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा तिला स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखलं जातं. पती विराट कोहलीसोबत आऊटिंग दरम्यानचा तिचा फॅशनेबल अवतारातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. तिच्या या स्टायलिश लुकवर चाहत्यांकडून लाइक व कमेंट्सचा वर्षाव केला जातोय. या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसची किंमती ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सेलिब्रिटींचे ड्रेस म्हटलं की डोळ्यासमोर लाखोंच्या किंमती फिरू लागतात. पण अनुष्का शर्माच्या या ड्रेसची किंमत ही जास्त नाही तर कमी असल्यामुळे जास्त चर्चेचा विषय बनलाय.

अनुष्का शर्माच्या ड्रेसमुळे चर्चेत आलेला तिचा हा फोटो रॉयल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामना दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघेही एकत्र दिसून येत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामना पहायला जाण्यासाठी तिने ‘फास्ट फॅशन ब्रॅंड झारा’चा ड्रेस परिधान केलाय. या ट्रेंडी कॉन्ट्रास्ट असलेल्या या मिनी ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. या ड्रेसमध्ये तिचा ऑफ ड्यूटी लूक अगदी खुलून दिसतोय. ट्विटरवर विराट कोहलीच्या एका फॅनने हा जुना फोटो शेअर केलाय. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यामागचं कारण अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत होय.

मोठ मोठ्या सेलिब्रिटींच्या ड्रेसची किंमत हा विषय आला त्या किंमतीची सुरवात लाखांपासून होताना अनेकदा आपण पाहिलंय. पण अनुष्काने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत ऐकून हैराण तर व्हाल पण ड्रेसच्या लाखोंच्या किंमतीमुळे नाही तर हजारांच्या किंमतीमुळे हैराण व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनुष्काने केवळ १२०० रूपये किंमतीचा असलेला ड्रेस परिधान केलाय. त्यामुळे तुम्हाला जर कपड्यांची फॅशन करण्याची आवड असेल, त्यात सुद्धा तुम्ही सेलिब्रिटींच्या फॅशन सेन्सला फॉलो करत असाल तर अनुष्काने परिधान केलेल्या या ड्रेसला तुम्ही देखील खरेदी शकता.

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती २०१८ साली रिलीज झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर तिचा कोणताच चित्रपट रिलीज झाला नाही. सध्या ती काही प्रोडक्शन हाऊसच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे, असं बोललं जातंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka sharma in rs 1k mini cut out dress looks effortless with virat kohli

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या