देशातील सामर्थ्यशाली व्यक्तींमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्रीला स्थान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान व्यक्तिमत्वांची यादी जाहिर केली. या यादीत ती एकमेव अभिनेत्री आहे. उर्वरीत ४९ व्यक्ती व्यवसाय, राजकारण व साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रातील आहेत. त्यामुळे अनुष्का आता देशातील सर्वात सामर्थ्यशाली अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे.

फॉर्च्यून इंडियाने जाहिर केलेल्या यादीत अनुष्का ३९ व्या स्थानावर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. फॉर्च्यून इंडियाने सोशल मीडिया, वृत्तपत्र, मासिक, वृत्तवाहिन्या यांच्यावर येणाऱ्या बातम्या, मुलाखती व विविध प्रकारच्या पोस्ट यांच्या आधारावर हे सर्वेक्षण केले आहे.

अनुष्का भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी म्हणून नेहमीच चर्चेत असते. शिवाय नीविया, एले १८, मिंत्रा डॉट कॉम यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची ती ब्रँड अँबेसिडर आहे. बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. ती केवळ बिग बजेट चित्रपटांमध्येच काम करते. तसेच अनुष्का इतर अभिनेत्रींच्या तुलनेने अधिक मानधन घेते. म्हणून भारतातील सर्वात सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत तिला स्थान देण्यात आले, असे स्पष्टीकरण फॉर्च्यून इंडियाने दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka sharma most powerful women fortune india list mppg

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या