बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अनुष्का तिच्या मॅगझिनच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. अनुष्काने हे फोटोशूट वामिकाच्या जन्मानंतर केलेले पहिले शूट आहे. यावेळी मुलाखतीत अनुष्काने गर्भधारणेदरम्यान तिच्या भीती आणि अडचणींविषयी सांगितले आहे.

अडचणींविषयी सांगत अनुष्का म्हणाली, “गरोदरपणात तिला भीती वाटत होती की, वामिकाच्या जन्मानंतर ती स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करू लागेल. कारण गर्भधारणा किंवा प्रसूतीनंतर एखाद्या स्त्रीने असे दिसायला हवे असा दबाव तिच्यावर असतो आणि त्या दबावामुळे अनुष्काला तिच्या प्रसूतीनंतरच्या शरीराचा विचार करून भीती वाटत होती.”

अनुष्का पुढे म्हणाली की, वामिकाच्या जन्मानंतर तिचं शरीर इतकं टोन्ड नसेल. पण तरीही ती तिच्या शरीरा बाबत समाधानी आहे. “एक आठवड्यापूर्वी मी एका मैत्रिणीला सांगत होते की, गर्भवती होण्यापूर्वी आणि बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना एका विशिष्ट पद्धतीने दिसावे या दबावामुळे मी किती घाबरले होते. मला स्वतःची जाणीव आहे पण असे असूनही, मी काळजी घेत होते. मी विचार करत राहिले- मी माझ्या शरीराचा तिरस्कार करेन का?’

आणखी वाचा : “…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन”, स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

अनुष्का पुढे म्हणाली, “माझे शरीर आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. ते पूर्वीसारखं टोन्ड नाही आणि मी त्यावर मेहनत घेत आहे. कारण मला फिट रहायला आवडतं. पण आज मी माझ्या शरीराबाबतीत समाधानी आहे. ती मनाची एक अवस्था आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. तुम्ही कसे दिसता याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. ती पूर्वी कशी दिसायची हे पाहण्यासाठी आता ती तिचे फोटो नीट लक्ष देऊन पाहत नाही. ती फोटो क्लिक करते आणि पोस्ट करते. आता तिने स्वतःला जशी आहे तसे स्वीकारले आहे. मी विराटला माझे काही जुने फोटो दाखवले आणि म्हणाली बघ मी आधी किती छान दिसायचे. तेव्हा विराट मला म्हणाला, ‘तुला माहितीये तू हेच करतेस. तू हे फोटो बघतेस आणि बोलतेस मी आधी सुंदर दिसायचे. पण जेव्हा मी तुला आता सांगतो की हा फोटो छान आहे तर तू म्हणतेस हा ठीक आहे.’ “

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाच विचारला हा विचित्र प्रश्न

तिच्या अडचणींविषयी बोलताना अनुष्का म्हणाली, तिला गरोदरपणात अनेक समस्या आल्या. मात्र त्यावेळी विराटने तिची काळजी घेतली आणि तिला धीर दिला. लॉकडाऊन होतं आणि विराट खेळत नसल्याने त्याने तिला पूर्ण वेळ दिला.