scorecardresearch

“मी देखील अगदी अशीच होते”; अनुष्का शर्माने सांगितला मुलीमधील ‘तो’ गुण

आई झाल्यापासूनच अनुष्काने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला आहे.

virat-anushka

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अद्याप त्यांची मुलगी वामिकाला मीडियासमोर आणलेलं नाही. अनेकदा दोघांना विमानतळावर वामिकासोबत स्पॉट करण्यात आलं असलं तरी वामिकाचा चेहऱा मात्र कॅमेरात कैद होणार नाही याची काळजी ते सतत घेत असतात. असं असलं तरी दोघही आपल्या मुलीच्या अनेक पोस्ट सतत शेअर करत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गुण सांगितला आहे. मुलीचा हा गुण अगदी तिच्यासारखाच असल्याचं ती म्हणालीय.

ग्रेझिया मासिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने तिच्यात आणि तिच्या मुलीमध्ये एक गोष्ट सारखीच असल्याचं सागितलं. ती म्हणाली, “मला ती अत्यंत दृढनिश्चयी वाटते. तिला जे करायचं आहे ते ती करतेच. तिच्याकडे पाहून मी सांगू शकते आयुष्यात ती काहीतरी उद्देशपूर्ण करणार आहे. हे पाहून खरं तर खूपच छान वाटतं. कारण मी देखील अगदी अशीच होते.” असं अनुष्का म्हणाली.

लग्नाच्या चर्चांवर आलिया भट्टने दिलं उत्तर, चाहत्यांना टाकलं कोड्यात!

पुढे अनुष्का म्हणाली, “तिला मार्गदर्शन करणं आणि सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी आहे. तिला दबावात ठेवणं किंवा खूप सूचना करण्याऐवजी तिला सपोर्ट करणं मी महत्वाचं समजते.” असं अनुष्का म्हणाली.


आई झाल्यापासूनच अनुष्काने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला आहे. पूर्ण वेळ ती मुलीसोबत घालवताना दिसते. अनुष्काला अनेकदा क्रिकेट सामन्यांच्या वेळी विराटसोबत स्पॉट केलं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-11-2021 at 16:23 IST
ताज्या बातम्या