“बायो बबल लाइफमधील प्रेम”; अनुष्का शर्माने शेअर केले विराटचे खास फोटो

अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला भेटण्यासाठी यूएईमध्ये दाखल झाली आहे. असं असलं तरी अनुष्काला विराटची थेट भेट घेणं शक्य झालेलं नाही.

anushka-shrma-virat-kohli-
(Photo-instagram@anushkasharma)

१७ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून टी-२० विश्वचषक सामन्यांना ओमानमध्ये सुरुवात होत आहे. भारतीय संघ यूएईमध्ये असून बॉलिवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला भेटण्यासाठी यूएईमध्ये दाखल झाली आहे. असं असलं तरी अनुष्काला विराटची थेट भेट घेणं काही शक्य झालेलं नाही. क्वारंटीनमध्ये असल्याने दोघांना दूरुनच नजर भेट घ्यावी लागत आहे. या बायो बबल लाइफ बद्दल अनुष्काने काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

अनुष्काने शेअर केलेल्या फोटोत विराट दूर एका बाल्कनीत उभा असल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या फोटोंमध्ये तो लॉनमधून ‘हाय’ करत असल्याचं पाहायला मिळतंय. हे फोटो शेअर करत अनुष्काने एक खास कॅप्शन दिलंय. या कॅप्शनमधून तिने बायो बबल लाईफमध्ये एकमेकांना दूर राहवं लागत असल्याचं दु:ख व्यक्त केलंय. तर अनुष्काच्या या फोटोंवर रणवीर सिंहने कमेंट केली आहे. “काय यार” असं रणवीर म्हणालाय. तर टेनिसपट्टू सानिया मिर्झाने “मी समजू शकते” अशी कमेंट केली आहे.

…आणि जिममध्येच ह्रतिक रोशन गरबा खेळू लागला, व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच विराटने एक फोटो शेअर करत ‘बायो बबल’मध्ये राहणं कसं असचं हे व्यक्त केलं होतं. “बायो-बबलमध्ये खेळताना असं वाटतं”, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं होतं.

आता विराट कोहलीच्या नजरा टी २० विश्वचषकाकडे खिळल्या आहेत. टी २० विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक जिंकत कर्णधारपदाचा शेवट गोड करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka sharma share photo quarantine with virat kohli said bio bubble love kpw

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!