‘कॅन्डीक्रश’, ‘टेम्पल रन’ या गेम्सचे वेड ओसरते ना ओसरते तोच सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती एका नव्या आणि भन्नाट खेळाची. ‘पोकेमॉन’ या कार्टून पात्राच्या लोकप्रियतेचा वापर करत ‘पोकेमॉन गो’ हा गेम सोशल नेटवर्किंग साइट्सवरही बरीच वाहवा मिळवत आहे. प्रत्येक स्मार्टफोनधारकासाठी हा गेम आणि त्यात सापडणारे पोकेमॉन म्हणजे कुतुहलाचा विषय झाला आहे. पोकेमॉन पकडण्यासाठीची धडपड, त्यासाठी केला जाणारा खटाटोप आणि रस्त्यावर होणारी आदळआपटही बरीच गाजत आहे. असे असताना जिथे ‘प्रिस्मा’ अॅपच्या फिल्टर्सचा मोह अनेक कलाकारांना आवरता आलेला नाही, तिथेच आता ‘पोकेमॉन गो’ या गेमनेही काही कलाकारांना वेड लावले आहे.
‘सुलतान’ फेम अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेला एक व्हिडिओ ने़टिझन्समध्ये आणि प्रसारमाध्यामांवर चांगलाच गाजतो आहे. या व्हिडिओमध्ये ‘पोकेमॉन गो’ हा गेम खेळणाऱ्या अनुष्काच्या चेहऱ्यावर पोकेमॉन पकडण्यासाठी लागून राहिलेली उत्सुकता स्पष्ट दिसते. अनुष्काला पोकेमॉन मिळणार की नाही हे बहुतेक तिच्या पोस्टमधून लवकरच कळू शकते. पण तूर्तास या गेमबद्दल उडणाऱ्या नकारात्मक हवेकडे दुर्लक्ष करत निदान अनुष्का शर्मा तरी या गेमचा आनंदच घेताना दिसते आहे. पोकेमॉन गो हा खेळ वास्तवात ‘जिओ कॅचिंग’च्या साह्याने चालता चालता आजूबाजूच्या ‘पोकेमॉन’ना पकडण्यासंदर्भात आहे.

Hooked But guys PLEASE be careful while playing !! #PokemonGo

A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

#PokemonGo

A video posted by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on