डॉक्टरांना सहकार्य न करणाऱ्या करोनाग्रस्तांवर संतापली अनुष्का; म्हणाली…

करोना विषाणूने जगभरात दहशत पसरवली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या प्राणघातक विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर्स जिवाचं रान करत आहेत. वैद्यकिय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून दिवस रात्र मेहनत करत आहेत. मात्र काही करोनाग्रस्त लोक उलट डॉक्टरांवरच टीका करत आहेत. त्यांना सहकार्य करण्यास नकार देत आहेत. अशा लोकांवर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाली अनुष्का?

“काही करोनाग्रस्त लोक डॉक्टरांना उपचारादरम्यान सहकार्य करण्यास नकार देत आहेत. अशा बातम्या वाचून फारच दु:ख होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण एकमेकांचे सहकार्य करायला हवे. अन्यथा आपले काही खरे नाही” अशा आशयाचे ट्विट अनुष्का शर्माने केले आहे.

अनुष्काचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांना यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अनुष्काच्या मतावर आपली सहमती दर्शवली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anushka sharma tweet on coronavirus mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या