बॉलिवूडमध्ये एकेकाळी ‘परफेक्ट कपल’ म्हणून अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्याकडे पाहिले जात होते. ज्यावेळी बॉलिवूडमध्ये घटस्फोटांची रांग लागलेली तेव्हाही या दोघांचे नाते अतूट राहिले होते. पण, गेल्यावर्षी दोघांनी अचानक घटस्फोट घेत असल्याचे जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मे महिन्यात हे दोघेही कायदेशीररित्या एकमेकांपासून विभक्त झाले होते. मात्र, त्यानंतरही दोघांच्यात कटूता निर्माण झाली नाही. मलायका आणि अरबाजचा मार्ग आता वेगळा झाला असला तरी ते अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात ते उपस्थिती लावतात. इतकेच नव्हे तर घटस्फोटाला मान्यता मिळण्याच्या एक दिवस आधी ते जस्टीन बिबरच्या मुंबईतील कॉन्सर्टसाठी एकत्र गेले होते.

वाचा : ‘होय, त्यानंतर मी मद्याच्या प्रचंड आहारी गेलो’

सध्या अरबाज ‘इंडियन ज्युनिअर प्लेयर लिग टी२०’ च्या उदघाटन सोहळ्यासाठी दिल्लीला गेला आहे. यावेळी, ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत देताना त्याने अनेक व्यवसायिक आणि कौटुंबिक गोष्टींवर भाष्य केले. तसेच, मलायकापासून विभक्त होण्याच्या निर्णयाचा त्यांचा १४ वर्षांचा मुलगा अरहान याच्यावर झालेला परिणाम याबद्दलही तो बोलला. ‘मला १४ वर्षांचा मुलगा आहे. ज्याला दुर्दैवाने आपल्या पालकांना कोणत्यातरी कारणामुळे विभक्त झाल्याचे पाहावे लागतेय. त्याच्यावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी माझ्या कुटुंबात जे काही बदल करण्याची गरज असेल, ते निश्चितच केले जातील. मलायका आणि तिच्या कुटुंबासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत. सध्या माझ्या मुलाला मी अधिक प्राधान्य देतोय. सद्य परिस्थिती सांभाळण्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे,’ असे अरबाजने सांगितले.

वाचा : सायनाची भूमिका साकारणाऱ्या श्रध्दाचे ‘दीपिका कनेक्शन’

अरबाज लवकरच सनी लिओनीसोबत ‘तेरा इंतजार’ चित्रपटात दिसेल. त्याचसोबत त्याची निर्मिती असलेल्या ‘दबंग ३’ चित्रपटाचेही काम सुरु आहे.